शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई : एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:16 IST

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची भीषण स्थिती आहे. तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी तीन महिन्यांचा कालावधी जिल्हा प्रशासनाकडून लावला जात आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा गावात पाण्याअभावी निम्मे गाव स्थलांतरीत झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देलाल गोटा गावातील नागरिकांचे पाण्याअभावी स्थलांतरनिमखेड गावातील टंचाई प्रस्तावावर तीन महिने कार्यवाही नाहीजळगाव जिल्ह्यातील विकासाचा वेग मंदावला

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२३ : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची भीषण स्थिती आहे. तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी तीन महिन्यांचा कालावधी जिल्हा प्रशासनाकडून लावला जात आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा गावात पाण्याअभावी निम्मे गाव स्थलांतरीत झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.सध्या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. मात्र या प्रकरणी जिल्हा प्रशासन गंभीर नाही. मुक्ताईनगर तालुक्यातील लाल गोटा गावात पाण्याची कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याने गावातील निम्मे कुटुंब स्थलांतरीत झाले आहे. निमखेड गावातील पाणी टंचाई संदर्भात १४ मार्च रोजी तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेसाठी ५ लाख २२ हजारांचा प्रस्ताव दाखल केला होता. मात्र त्यामध्ये त्रुटी काढून हा प्रस्ताव परत पाठविण्यात आला. त्यानंतर जि.प.सीईओ यांनी आपल्याला पाच लाखांपर्यंतच्या मंजुरीचे अधिकार असल्याची त्रुटी काढली. त्यानंतर नव्याने तीन लाखांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यानंतर काल हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. एका प्रस्तावासाठी फाईल मंजुरीचा तीन महिन्यांचा प्रवास होत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा प्रशासनाकडून पाणी टंचाईबाबत काय उपाययोजना करण्यात आली याबाबत आपण माहिती मागविली असून त्यासंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करणार आहोत. उन्हाळ्याची स्थिती असताना जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत किती आणि कोठे कामे सुरु आहे असा सवाल त्यांनी केला. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याअभावी जळगाव जिल्ह्यातील विकासात शिथीलता आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगाव