शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात तयार झाले गुडघ्यावरील कृत्रिम आवरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 12:20 IST

रावेर तालुक्यातील तरुणीवर देशातील सातवी शस्त्रक्रिया

विजयकुमार सैतवालजळगाव : गुडघ्याची झिज होण्यासह त्यावरील आवरणास अथवा वाटीला काही इजा झाल्यास गुडघे बदल करणे हा एकमेव पर्याय असताना जळगावात नवीन संशोधनाचा अवलंब करीत गुडघ्यावरील कृत्रिम आवरण यशस्वीरित्या तयार करण्यात आले. विशेष म्हणजे चालू-फिरु शकत नसलेल्या तरुणीच्या गुडघ्यावर हे आवरण टाकण्यात आल्याने ही तरुणी आज व्यवस्थित चालण्यासह तिचा पायही वाकू लागला आहे. जळगावात झालेली ही देशातील सातवीच शस्त्रक्रिया असून या निमित्ताने जळगावातील वैद्यकीय क्षेत्राने देशात पुन्हा एकदा आपले नाव देशभरात पोहचविले आहे.वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन संशोधन मानवाला वरदान ठरत आहे. यात ह्रदय बदल करणेही या क्षेत्राने शक्य करून दाखविले आहे. असे असले तरी काही छोट्या-छोट्या वेदनांमुळे अनेक जण त्रस्त असतात. अशाच प्रकारे वयोमानानुसार गुडघे दुखी, त्यांची झीज होणे आणि आता तरुण वयातही चालता-फिरताना अथवा शेतात काम करताना पाय मुरगळ््यास त्यामुळे होणाऱ्या दुखापतींचे (स्पोर्ट इन्ज्युरी) प्रमाण वाढत आहे. यात पूर्वी थेट गुडघे बदल करावे लागत असे. कालांतराने यात बदल होत जाऊन गुडघ्याचा जेवढा भाग खराब झाला तेवढाच बदलविण्याचे संशोधन पुढे आले व त्यामुळे गुडघे दुखापतग्रस्तांना बराच दिलासा मिळाला. हे संशोधन झाले तरी गुडघ्यावरील कृत्रिम आवरण तयार करणे मात्र शक्य झालेले नाही. त्यामुळे आता देशात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत रुग्णाच्या अस्थिमज्जातून (बोनमॅरो) स्टेमसेल काढून त्यापासून गुडघ्यावरील आवरण तयार केले जात आहे. देशात सहा ठिकाणी अशा प्रकारचे आवरण तयार करण्यात येऊन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्या पाठोपाठ आता जळगावातही अशाच प्रकारे कृत्रिम आवरण तयार करण्यात येऊन एका तरुणीला पुन्हा चालते-फिरते केले आहे.तीन महिन्यात तरुणी चालू लागलीरावेर तालुक्यातील एक तरुणी घरातच अचानक पडली व तिच्या गुडघ्यातील आवरणाचा तुकडाच पडला. त्यामुळे तिला पाय वाकविताही येत नव्हता की चालता येत नव्हते. यामुळे तिचे महाविद्यालयात जाणेही अवघड झाले. त्यानंतर जळगावात तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. केवळ अठराव्या वर्षी गुडघा बदलणे शक्य नसल्याने आवरणाचा तुकडा पडलेल्या जागी पुन्हा दुसरे आवरण लावणेच योग्य ठरणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार तरुणीच्या अस्थिमज्जातून स्टेमसेल काढण्यात आले व विदेशातून काही वस्तू मागवून जळगावात कृत्रिम आवरण तयार करण्यात येऊन त ेतिच्या गुडघ्यातील आवरणाच्या तुटलेल्या जागी टाकण्यात आले. त्यामुळे तीन महिन्यातच ही तरुणी पुन्हा व्यवस्थित चालत असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले.गुडघ्यातील आवरण तयार करणे आतापर्यंत शक्य झालेले नाही. मात्र आता नवीन संशोधनानुसार रुग्णाच्या बोनमॅरोमधून स्टेमसेल काढून हे आवरण तयार केले जात आहे. देशात आतापर्यंत सात ठिकाणी अशा प्रकारचे आवरण तयार करण्यात येऊन शस्त्रक्रिया केल्या गेल्या. आता जळगावातही अशाप्रकारचे आवरण तयार केले. वैद्यकीय क्षेत्रातील हा एक अविष्कार आहे.- डॉ. मनीष चौधरी, सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ.

टॅग्स :Jalgaonजळगाव