शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आर्ट गॅलरीमुळे कलावंताना मिळाले हक्काचे व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:44 IST

जळगावसह नाशिक, मुंबईतील कलावंतांचा सहभाग अणि उज्ज्वल भवितव्याची वाटही सुकर

सचिन देव  जळगाव : कला ही नेहमी जिवंत असते. मात्र, ही कला समाजापर्यंत पोहचण्यासाठी कलाकाराला व्यासपीठ मिळणे गरजेचं आहे, तरंच ही कला व्यापक पद्धतीने समृद्ध होत असते. जळगावातील अशाच नवोदित कलाकारांना गेल्या दीड वर्षांपासून पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरीने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले असून, आतापर्यंत स्थानिक कलावंतांसह नाशिक व मुंबईतील कलाकारानींही जळगावला येऊन चित्रांचे प्रदर्शंन भरविले आहे.कलावतांसाठी ३ मार्च २०१८ ला ही आर्ट गॅलरी उपलब्ध करुन देण्यात आली. विशेष म्हणजे प्रदर्शनासाठी कुठल्या प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सर्व सुविधा मोफत दिल्या जात आहेत. या आर्ट गॅलरीचं वैशिष्टये म्हणजे चित्रकृती व शिल्पकृती मांडण्यासाठी प्रशस्त दालन आणि कलाकृती उठावदार दिसतील.अशा पद्धतीची या ठिकाणी प्रकाश योजना करण्यात आली आहे. भितींना चित्रांच्या प्रतिकृती लावल्यानंतर एक प्रकारे निसर्गाचा सहवासचं प्रेक्षकांना घडतो, असे वातावरण असते. दरम्यान, जळगावातील कलावतांना प्रथमच प्रशस्त अशी आर्ट गॅलरीचे व्यासपीठ मिळाल्यामुळे, अनेक कलावतांनी येथील अभिप्राय डायरीमध्ये आपले मनोगत व्यक्त करुन, या चित्र प्रदर्शनातून उज्जवल भवितव्याची वाट निर्माण होणार असल्याचे नमूद केले आहे.मार्च २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ४३ जणांनी या ठिकाणी प्रदर्शन भरविले आहे. एका कलावंताला १५ दिवस प्रदर्शन भरविण्याची संधी दिली जाते. गॅलरीतर्फे उद्घाटनाचे सर्व साहित्यही मोफत पुरविले जाते, मदतीसाठी कर्मचारी दिला जातो. कलावतांकडून प्रदर्शनासाठी गॅलरीचे बुकींग करतेवेळी फक्त नाव, पत्ता व दुरध्वनी घेतला जातो. विशेष म्हणजे नव्या वर्षांतील बहुतांश महिन्यांच्या तारखाही आतापासून आरक्षित झाल्या आहेत.आर्ट गॅलरीत आतापर्यंत निसर्ग चित्र, कॅलिग्रॉफी, पेन्टींग, मॉडर्न आर्ट, भारतीय अलंकारिक शैली चित्र, लॅन्टन डिझाईन, लॅण्ड स्केप, व्यक्ती चित्र, शिल्प चित्र, कोलाज, कॅनव्हान्स न्युरल पेपरवरील चित्रे, रेखाटन चित्रे, पेन्सील स्लायडींग चित्रे, सुलेखन कला यासह विविध प्रकारच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी तर जळगावकरांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते.

टॅग्स :Jalgaonजळगाव