शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
7
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
8
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
10
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
11
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
12
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
13
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
14
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
15
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
16
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
17
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
18
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
19
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
20
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका

हिवाळी फळांची आवक, पण मंदगतीने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:27 IST

दरवाढ : अवकाळी पावसामुळे हंगाम लांबल्याचा परिणाम, आवळ्याचे मोठे नुकसान

जळगाव : हिवाळा सुरु झाल्यानंतर आता बाजारपेठेत हळूहळू अनेक फळांनी कब्जा मिळवला आहे. लांबलेल्या पावसामुळे यंदा फळेही १५ ते २० दिवस उशिराने बाजारात दाखल झाली आहेत. पावसाने यंदा फळांची आवकही काहीशी मंदावली असून दरही १० ते ३० रुपयांनी वाढले आहेत.यंदा दिवाळीच्या मोसमातही तुफानी पाऊस झाल्याने हिवाळा काही दिवस लांबला तर पावसामुळे फळपिकांचे नुकसान झाले. तसेच हिवाळी फळांचा हंगामही लांबला आहे. पावसामुळे फळांची आवक मंदावली आहे. साधारणपणे हिवाळ्यात आवळ्याची जास्त प्रमाणात खरेदी होते. हा आवळा ज्यूस, आवळासुपारी वा कंटी बनवण्यासाठी जास्त करून वापरला जातो. यंदा आवळ्याची आवक काही प्रमाणात मंदावली आहे. दोन दिवसांपूर्वी ५० रुपये किलो असलेला आवळा मंगळवारी ४० रुपये किलो या दराने विकला जात होता. गेल्यावर्षी आवळ्याची ३० रुपये किलो दराने विक्री होत होती. जळगावात आलेला हा आवळा इंदोरवरून दाखल झाला असून या भागातही पावसामुळे आवळा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा दरात प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.नागपूरहून येणाऱ्या संत्र्यांनीही भाव खाल्ला आहे. गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट दराने सध्या संत्र्यांची विक्री सुुरु आहे. गेल्यावर्षी ४० रुपये किलो या दराने विकली जाणारी संत्री यंदा मात्र ८० रुपयांपर्यंत पोहोचली आहेत.यंदा गुजरातची बोरे स्थानिक जातीच्या बोरांपेक्षा लवकर दाखल झाली आहेत. गुजरातहून येणाºया चमेली बोरांचा सध्याचा दर हा ६० रुपये किलो असा आहे तर स्थानिक शेतकऱ्यांकडून बाजारपेठेत बोरांची आवक वाढल्यानंतर हा दर कमी होईल, असा अंदाज व्यापाºयांनी व्यक्त केला आहे.सीताफळे ८० रुपये तर पेरू ५० ते ६० रुपये किलो या दराने विकले जात आहेत. गेल्यावर्षी पेरू आणि सीताफळ यांचा दर हा ३० ते ४० रुपये किलो होता. यंदा या दरात चक्क दुपटीने वाढ झाली आहे. पावसामुळे ही दोन्ही फळे उशिराने दाखल झाली आहेतच; शिवाय आवकही कमी झाल्याने या दोन्ही फळांचे दर कमी होतील, असे सध्यातरी चित्र नाही, असे काही फळ विक्रेत्यांनी सांगितले. हंगाम लांबल्याचा फळविके्रत्यांना फटका बसल्याचे चित्र आहे़स्थानिक बोरांची आवक वाढल्यास दर कमी होणार.जळगावच्या बाजारपेठेत अजूनही चमेली बोरांचीच आवक आहे. जळगाव, मेहरूण येथील बोरांची आवक अजूनही झालेली नाही. नंदूरबारकडून येणाºया अ‍ॅपल बोरांचीही प्रतिक्षाच आहे. ही बोरे पुढील दहा दिवसात दाखल होतील, असा व्यापाºयांचा अंदाज आहे. ही बोरे बाजारपेठेत आल्यानंतर दर कमी होतील, असे व्यापाºयांनी सांगितले.मटारचीही आवकजबलपूर येथून मटारचीही (वाटाणे) आवक झाली असून गेल्या आठवड्यात मटारचे दर १०० ते १२० रुपये होते. मात्र आवक वाढल्याने आता हेच दर ८० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.सीताफळांचा हंगाम समाप्तीच्या मार्गावरसीताफळांचा हंगाम आणखी ४ ते ५ दिवसच राहील, असे काही व्यापाºयांनी सांगितले. सीताफळांचा हंगाम हा नवरात्रोत्सव ते दिपावलीदरम्यान सुरु होतो. यंदा हा हंगामही १५ दिवस लांबला. मात्र आता हा हंगाम समाप्तीच्या मार्गावर आहे, असे व्यापाºयांनी सांगितले. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव