शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

रावेर येथे १० हजार रुपयांची लाच घेतांना फौजदारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 17:54 IST

निकाळजे यांच्या बंगल्याच्या शेजारील बांधकामाजवळ केली कारवाई

ठळक मुद्देगुरुवारी दुपारी साडेतीन वाजता केली अटकनिकाळजे यांच्या बंगल्यांच्या बांधकाम स्थळी कारवाई गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू

आॅनलाईन लोकमतरावेर,दि.७ : राजस्थान पासिंगच्या मार्बल व कोटा वाहतूक करणाºया चालकाकडून १० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने फौजदार प्रवीण निकाळजे याला गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता रंगेहाथ अटक केली.निरूळ येथील रहिवासी विनायक धनसिंग पाटील यांच्या पूर्वी खानापूर नजीक बºहाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावरील ढाबा व्यवसायातून राजस्थानमधून मार्बल व कोट्याच्या मालाची अवजड हाफबॉडी ट्रकने वाहतूक करणाºया ट्रकचालकांशी ओळख झाल्याने त्यांच्या वाहतुकीत अडचण निर्माण झाल्यास ती सुकर करून देण्याची मदत ते करीत असत.दरम्यान, गत पाच - सहा महिन्यांपासून मार्बल व कोटा वाहतूक करणाºया ट्रकचालकांकडून चिरीमिरी घेऊन त्यांना सोडण्याचे काम सुरू होते. मंगळवारी मार्बल कोटा वाहतूक करणाºया आर. जे.- ०२ पासिंगच्या हाफबॉडी ट्रकचालकांकडून रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण निकाळजे यांनी दहा हजार रुपयांची लाच ट्रक चालकांचा मध्यस्थ विनायक धनसिंग पाटील (रा निरूळ ता रावेर) यांचेकडे मागितली होती.विनायक पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. उपअधीक्षक ठाकूर यांनी पथकासह गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ठरल्याप्रमाणे फियार्दीकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना फौजदार प्रवीण निकाळजे यांच्यावर छापा घालून रंगेहाथ पकडले. येथील तडवी कॉलनीत फौजदार निकाळजे यांच्या बंगल्यांच्या बांधकाम स्थळी ही कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सायंकाळी शासकीय विश्रामगृहात जाबजबाब नोंदवण्याचे व गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

टॅग्स :JalgaonजळगावRaverरावेर