जामनेर, जि.जळगाव : रांजणी, ता.जामनेर शिवारातील शेतात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या सहा महिन्यांच्या दोन बछड्यांसह दिसत आहे. यामुळे रविवारी सकाळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सहकाºयांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.रांजणी येथील संजय रघुनाथ भगत व लखीचंद शिवचंद जेरवाल यांना शेतात रात्री बछड्यांसह बिबट्या दिसल्याने भागवत तेली यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील यांना कळविले.वनरक्षक एस.एम.कोळी, वनरक्षक पी.एस.भारुडे, नाकेदार ए.एस.ठोमरे, वनरक्षक पी.एन.गरजाळे, वनरक्षक यु.एन. कोळी, वनरक्षक विकास गायकवाड, गणेश कन्नारे, प्रल्हाद काळे यांनी भगत व जेरवाल यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. बिबट्याच्या पायाचे ठसे स्पष्ट दिसत नसले तरी शेतकºयांंनी सावधानता बाळगण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.
रांजणी परिसरात बिबट्याचा बछड्यांसह वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 18:48 IST
रांजणी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या सहा महिन्यांच्या दोन बछड्यांसह दिसत आहे.
रांजणी परिसरात बिबट्याचा बछड्यांसह वावर
ठळक मुद्देवनअधिकाऱ्यांची रांजणीत पाहणीसावधानी घेण्याचे वनविभागाचे आवाहन