शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील चार शिक्षकांच्या मान्यता रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 19:07 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील मि.फ.तराळ विद्यालयात चार शिक्षक भरती प्रकरणात शिक्षकांच्या नियुक्त्या नियमानुसार नसल्याचा ठपका ठेवत चारही शिक्षकांच्या मान्यता शिक्षण उपसंचालकांंनी रद्द केल्या आहेत. त्यात नीलेश चुन्नीलाल सोनवणे, दीपक गौतम मसाने, प्रतीक पंडित तायडे व सतीश प्रभाकर पाटील या चार शिक्षकांचा समावेश आहे.

ठळक मुद्देमि.फ.तराळ विद्यालयातील शिक्षकांचा समावेशबॅक डेटेड दाखवून मान्यता घेतल्याचा आरोपराजकीय सूड भावनेने शिक्षकांचे भविष्य खराब करण्याचा प्रकार असल्याचा सूर

मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील अंतुर्ली येथील मि.फ.तराळ विद्यालयात चार शिक्षक भरती प्रकरणात शिक्षकांच्या नियुक्त्या नियमानुसार नसल्याचा ठपका ठेवत चारही शिक्षकांच्या मान्यता शिक्षण उपसंचालकांंनी रद्द केल्या आहेत. त्यात नीलेश चुन्नीलाल सोनवणे, दीपक गौतम मसाने, प्रतीक पंडित तायडे व सतीश प्रभाकर पाटील या चार शिक्षकांचा समावेश आहे.जनता शिक्षण प्रसारक मंडळ अंतुर्ली संचलित मि.फ.तराळ विद्यालयात शिक्षकांच्या नियुक्त्या शिक्षक भरतीला शासनाकडून बंदी असताना करण्यात आल्या. नेमणुका बॅक डेटेड दाखवून मान्यता घेण्यात आली. संस्थेने शिक्षक भरतीचे ठराव वेगवगळे केले आणि चारही शिक्षकांना एकाच आदेशात नियुक्ती पत्र दिले. तसेच हमीपत्रसुद्धा सर्वांचे एकत्र घेतले. यासह अन्य मुद्यांच्या आधारे चारही शिक्षकांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याची तक्रार होमराज बळीराम महाजन यांनी नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केली होती. शिक्षण उपसंचालकांनी चौकशी लावली. सुनावणीत व दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. चौकशी अधिकारी म्हणून उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी शिक्षक भरतीसंदर्भातील दिलेला अहवाल गृहीत धरून मि.फ.तराळ विद्यालयातील या चारही शिक्षकांची मान्यता शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी रद्द ठरवली आहे.दरम्यान, राजकीय सूड भावनेने सदर शिक्षकांचे भविष्य खराब करण्याचा हा प्रकार होय, यावर शिक्षण संचालकांकडे दाद मागण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया संस्थेच्यावतीने देण्यात आली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणMuktainagarमुक्ताईनगर