शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

अपिल उच्च न्यायालयात फेटाळले

By admin | Updated: August 28, 2014 15:01 IST

मनपाच्या बँक खाते सील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाखल अपिलावर बुधवारी सुनावणी होऊन ते फेटाळण्यात आले.

जळगाव : मनपाच्या बँक खाते सील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाखल अपिलावर बुधवारी सुनावणी होऊन ते फेटाळण्यात आले. याप्रकरणी खाते सीलचा आदेश देणार्‍या डीआरटीतच अपिल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. डीआरटीने ८ आठवड्यांच्या आत हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मनपाच्या बँक खाते सील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाखल अपिलावर गुरुवार, २१ रोजीदेखील कामकाज होऊ न शकल्याने याप्रकरणी २८ ऑगस्ट रोजी पुढील कामकाज होणार होते. दरम्यान शुक्रवार, २२ रोजी मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेत मनपाच्या मार्केट गाळे लिलावावरील स्थगिती उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच याबाबत उच्च न्यायालयात शपथपत्रही देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मनपाचा कर्जफेडीचा मार्ग मोकळा झाला आहे. 
याप्रकरणात न्यायालयाने मनपाला सर्व बँक खात्यांमध्ये असलेली रक्कम, हुडकोला केलेल्या कर्जफेडीबाबतची माहिती आदीबाबत शपथपत्र मागितले आहे. ते बुधवार, २७ रोजी दाखल करण्यात आले. 
तसेच शासनातर्फेही २२ रोजी मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीतील मुद्यांची तोंडी माहिती देण्यात आली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर याप्रकरणी न्यायालयाने मनपाने खाते सीलचा आदेश देणार्‍या डीआरटी कोर्टातच अपिल करावे, असे आदेश दिले. बँकेचे सील उघडण्याचे आदेश देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली.
-----------
संपविण्याचे आदेश
बैठक घेऊन सील हटविण्याची मागणी करावी शासन, हुडको व मनपा आयुक्तांनी त्वरीत दोन-तीन दिवसांत कर्ज थकबाकीच्या तडजोडीसाठी (वन टाईम सेटलमेंट) बैठक घेऊन रक्कम ठरवून तो प्रस्ताव डीआरटी कोर्टात सादर करून सील हटविण्याची मागणी करावी, तसेच मूळ प्रकरणही चालवून घ्यावे, आठ आठवड्यांच्या आत प्रकरण संपवावे, असे आदेश न्यायालयाने दिले. अपिल पूर्वीच दाखल मनपाने डीआरटी कोर्टात यापूर्वीच खाते सील करण्याच्या आदेशाविरुद्ध अपिल दाखल केले आहे. त्यावर गुरुवार २८ रोजी कामकाज होत आहे. त्यातही मनपातर्फे महासभेत झालेल्या ठरावाची माहिती देऊन खाते सीलचे आदेश मागे घेण्याची मागणी करणार आहे. मनपा आजच अर्ज करणार मनपातर्फे हुडकोकडे गुरुवारीच तातडीने अर्ज करण्यात येऊन महासभेने कर्जफेडीसाठी गाळे कराराच्या ठरावाची माहिती दिली जाणार आहे. तसेच एकरक्कमी कर्ज फेडीसाठी मनपाने पाऊल उचलले असल्याने तडजोडीबाबत चर्चा करण्यासाठी पाऊल उचलले जाणार आहे. दरम्यानच्या काळात मनपाला दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवता यावे, यासाठी हुडकोनेही डीआरटी न्यायालयात मनपाला सूट देण्यासाठी सहमती द्यावी, अशी विनंती केली जाणार आहे.