शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यातील टंचाई आराखड्यातील गावांखेरीज १९ गावांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 15:52 IST

रावेर तालुक्यातील टंचाई आराखड्यातील ११ गावांखेरीज आणखी १९ गावांची आराखड्याखेरीज पंचायत समिती भूजल तंत्रज्ञांकडे नोंद झाली आहे.

ठळक मुद्दे११ ग्रामपंचायतींकडून अद्यापही प्रस्ताव नसल्याची शोकांतिका ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरील प्रशासन मात्र ढिम्मच कूपनलिका व इंधन विहिरींची योजना थंड बस्त्यात

रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील टंचाई आराखड्यातील ११ गावांखेरीज आणखी १९ गावांची आराखड्याखेरीज पंचायत समिती भूजल तंत्रज्ञांकडे नोंद झाली असून, त्या अतिरिक्त १९ गावांपैकी चक्क ११ ग्रामपंचायतकडून टंचाई आराखडा वा तातडीची टीपीडब्ल्यूएस योजनेकरिता अद्यापही प्रस्ताव सादर झाले नसल्याची शोकांतिका आहे.रावेर पंचायत समितीच्या प्रभारी कार्यकाळात ग्रामसेवक वा ग्रामविकास अधिकाऱ्यांची ग्रामीण स्तरावर पाणीटंचाईच्या ज्वलंत प्रश्नाबाबत असलेली उदासीनता व मनमानी कारभार यामुळे अधोरेखित होत असल्याची गंभीर टीका होत आहे.दरम्यान, ११ गावांकरीता मंजूर झालेल्या १४ योजनांमधील जुनोने व जानोरी येथील योजना पूर्णत्वास आल्या आहेत. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात मंजुरी मिळालेल्या अन्य ११ कूपनलिका व इंधन विहिरींची योजना थंड बस्त्यात असल्याने गटविकास अधिकाऱ्यांना पाणीटंचाईचे गांभीर्य नसल्याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. सायबूपाड्या, सिंगनूर, गोलवाडे, खिरवड, रमजीपूर, ऐनपूर, भाटखेडा, रोझोदा, तिड्या, अंधारमळी, रसलपूर, भोर, वाघोड, मोरगाव खुर्द, निरूळ व नेहता या अतिरिक्त गावांचा टंचाई आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.दरम्यान, तामसवाडी येथील ग्राम पंचायतींचा विहीर अधिग्रहण करण्याबाबत प्रस्ताव दाखल झाला आहे. मस्कावद बुद्रूक ग्रामपंचायतने पाणीपुरवठा योजनेचा भूजलस्त्रोत हरपल्याने मस्कावद खुर्द येथील कूपनलिकेपर्यंत पाईपलाईन करण्यासाठी पाणी टंचाई निर्मूलनासाठी तातडीची पाणीपुरवठा योजनेकरीता आजच प्रस्ताव दाखल केल्याची माहिती सूुत्रांनी दिली. शासनस्तरावरून पाणीटंचाई निर्मुलनासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबवल्या जात असताना मात्र पंचायत समिती प्रशासन गंभीर नसल्याबाबत खंत व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRaverरावेर