शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील राखीव जागा सोडून नवीन भूसंपादनाचा अट्टाहास

By admin | Updated: May 25, 2017 11:03 IST

ट्रक टर्मिनसचा विषय : थोडय़ा पाठपुराव्यामुळे 7 एकर जागा मिळणे शक्य

ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.25- मनपाकडून ट्रक टर्मिनससाठी मनपाच्या वाढीव हद्दीच्या आराखडय़ात असोदा शिवारात आरक्षित केलेली जागा संपादित करण्याचा प्रय} सुरू आहे. मात्र ही बागायती जमीन असल्याने शेतक:यांचा त्यास तीव्रविरोध आहे. एमआयडीसीत ट्रक टर्मिनससाठीच तब्बल 30 हजार चौरस मीटर म्हणजे 7 एकर जागा आरक्षित असून ती अद्याप कुणासही दिलेली नाही. त्यामुळे मनपाने हीच जागा मिळविण्यासाठी पाठपुरावा करणे फायदेशिर ठरणार आहे. मात्र मनपाकडून त्याऐवजी भूसंपादनाचा अट्टाहास केला जात आहे. 
मनपाने ट्रक टर्मिनससाठी 1999 मधील वाढीव हद्दीच्या विकास आराखडय़ानुसार मौजे असोदा येथील गट क्र.1214,1215, 1216, 1217,1219 वर आरक्षण क्र.227 टाकले आहे. या जागेपैकी काही जागा महामार्गासाठी संपादित झाली आहे. त्यामुळे मनपाला या जागेची मोजणी करून किती जागा शिल्लक राहते? याचा अंदाज घेऊन भूसंपादनाची कार्यवाही करावी लागणार आहे. त्यासाठी मनपाने भूमिअभिलेख विभागाकडे मोजणीसाठी पैसेही भरले  आहेत. 
या मोजणीसाठी 4 मार्च रोजी भूमिअभिलेखच्या अधिका:यांसोबत गेलेल्या मनपाच्या अधिका:यांना जागामालक शेतक:यांनी तीव्र विरोध केला. एका शेतक:याने तर अंगावर रॉकेल टाकून घेत पेटवून घेण्याची धमकी दिल्याने हे पथक रिकाम्या हाती परतले होते. त्यामुळे  मंगळवार, 23 मे रोजी नगररचना विभागाचे  पथक पोलीस बंदोबस्तात जागा मोजणीसाठी गेले. मात्र त्यास शेतक:यांनी पुन्हा तीव्र विरोध केला. त्यामुळे या पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले. 
एमआयडीसीत जागा आरक्षित
एमआयडीसीत एम-सेक्टरमध्ये एमएसईबी पॉवर स्टेशन शेजारी 30 हजार चौरस मीटर जागा म्हणजेच तब्बल 7 एकर जागा ट्रक टर्मीनससाठी आरक्षित आहे. ती खाजगी व्यक्ती अथवा संस्थेलादेखील विकसित करण्यासाठी घेता येणार आहे. मात्र त्यासाठीचा खर्च अधिक असल्याने अद्याप कोणीही ही जागा घेतलेली नाही. 
या जागेसाठी मनपाने प्रस्ताव दिल्यास मनपाला शेतजमिनीच्या तुलनेत स्वस्तात ही जमीन उपलब्ध होऊ शकेल. कारण शासकीय दराने ही जागा उपलब्ध होईल.