शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

असाही फटका, ‘कोरोना’मुळे चीनला कापूस निर्यात ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 12:34 IST

३ लाख गाठी पडूनच, जिल्ह्यात सीसीआयने खरेदी थांबवली

अजय पाटील जळगाव : कोरोना व्हायरस पसरल्यामुळे चीन सरकारने कापसाची ८० टक्के आयात-निर्यात थांबवली आहे. त्यामुळे ३ लाख गाठी भारताकडे पडून आहेत. निर्यात थांबल्यामुळे सीसीआयने देखील जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र बंद केले आहेत. शासकीय खरेदी बंद झाल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पुन्हा लूट सुरु झाली असून शेतकºयांनाही नाईलाजास्तव हमीभावापेक्षा ५०० रुपये कमी दराने कापूस विक्री करावा लागत आहे.दरवर्षी भारताकडून १२ ते १५ लाख गाठी चीनला निर्यात होतात. यंदा जानेवारीपर्यंत ६ लाख गाठींची निर्यात चीनमध्ये झाली आहे. मात्र, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रमाणामुळे भारतातून जाणारा माल देखील चीनने थांबवला आहे. भारताकडून चीनला पाठविण्यात येणाºया ३ लाख गाठी पडून आहेत. केंद्र बंद करण्याचा फतवासीसीआयचे केंद्र दरवर्षी मार्च-एप्रिलपर्यंत सुरु असतात. मात्र, ३० जानेवारी रोजी सीसीआयने तातडीने पत्र काढून ५ फेब्रुवारीपर्यंत कापूस खरेदी थांबविली. तसेच पुढील आदेश येईपर्यंत खरेदी सुरु करू नये असेही आदेश काढले आहेत. कापूस खरेदी थांबविण्याबाबतचे कोणतेही कारण सीसीआयने दिलेले नाही.हमीभावात १०० रुपयांची घटआंतरराष्टÑीय बाजारात पसरलेल्या मंदीचा परिणाम कापसाच्या भावावर देखील झाला लाखो गाठी भारताच्या बाजारातच पडून असल्याने आठवडाभरात हमीभावात १०० रुपयांची घट झाली आहे. शासनाने कापसाचा हमीभाव ५५५० इतका निश्चित केला होता. मात्र, सध्या ५४५० इतक्या भावाने कापसाची खरेदी होत आहे. सीसीआयने जरी खरेदी थांबवली असली तरी मात्र पणन महासंघाचे खरेदी केंद्र सुरु आहेत.शासकीय खरेदी थांबल्याने शेतकºयांची लुट सुरुहमीभावात १०० रुपयांची घटव्यापाºयांकडून हमीभावापेक्षा तब्बल ५०० रुपये कमी दराने होतेय खरेदीअद्याप ५० टक्के कापूस शेतकºयांच्या घरातचसीसीआयचे केंद्र बंद होताच व्यापारी-एजंट सक्रीय४आतापर्यंत जिनींग किंवा शासकीय खरेदी केंद्रावर १५ लाख क्ंिवटल कापसाची खरेदी झाली आहे. अद्याप ५० टक्के माल शेतकºयांच्या घरातच पडून आहे. त्यातच शासकीय खरेदी थांबल्यामुळे आता ती पुन्हा सुरु होईल की नाही ? याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आता शेतकºयांना खासगी जिनींग व व्यापाºयांना माल देण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत व्यापाºयांकडून ४७०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल कापूस खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकºयांचे तब्बल ५०० ते ६०० रुपयांचे नुकसान होत आहे.कोरोना व्हायरसमुळे चीनने बाहेरच्या देशातून मालाची आयात पुर्णपणे थांबवली आहे. त्यामुळे आंतरराष्टÑीय बाजारावर देखील त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे भावात देखील घट झाली आहे. ही परिस्थिती सुधारल्यास भविष्यात भाव वाढण्याची शक्यता राहिल. मात्र, सध्या तरी तसे चित्र नाही.-हर्षल नारखेडे, जिनर्स व कापूस बाजाराचे तज्ज्ञसीसीआयने खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, केंद्र बंद करण्याचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, कापूस बाजारात प्रचंड मंदी आहे. जिनर्सकडेही शेतकºयांनी पाठ फिरवली आहे. चीनने निर्यात पुन्हा सुरु केली तर परिस्थिती सुधारू शकेल.-प्रदीप जैन, अध्यक्ष, खान्देश जिनींग असोसिएशन

टॅग्स :Jalgaonजळगाव