ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.4- अनुभूती निवासी शाळेचे विद्यार्थी आत्मन अशोक जैन आणि अंशुमन फडतरे यांच्या तबलावादनातील विशेष प्राविण्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जळगाव येथील खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानज्योत इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्सलन्सतर्फे एप्रिल 2017 मध्ये महाराष्ट्र आर्ट टॅलेन्ट सर्च आर्ट विभागासाठी परीक्षा घेतली गेली. इंडियन क्लासिकल संगीतात महत्त्वाची समजली जाणारी ही परीक्षा आहे. या स्पर्धेत अनुभूती निवासी शाळेचे विद्यार्थी आत्मन जैन (इयत्ता 8वी) आणि अंशुमन फडतरे (इयत्ता 6 वी) यांनी सहभाग घेतला होता. या दोघांनी तबला वादनाचे कसब दाखवित परीक्षकांचे लक्ष वेधले होते. स्पर्धेत ते अव्वल ठरल्याने त्यांना इंडियन टॅलेन्ट सर्चतर्फे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या निमित्त अनुभूती निवासी शाळेचे प्राचार्य जे.पी.राव, स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी कौतुक केले. प्राचार्य जे.पी.राव यांच्याहस्ते दोघांचा नुकताच सन्मान करण्यात आला.