शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय जल पुरस्कारात आनोरे देशात दुसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 20:53 IST

संजय पाटील अमळनेर , जि. जळगाव :  पाणी फौंडेशनच्या स्पर्धेत राज्यात तिसरे बक्षीस मिळवणाऱ्या आनोरे गावाला राष्ट्रीय जल पुरस्कार ...

ठळक मुद्दे१०० टक्के वॉटर हार्वेस्टिंग आणि शोषखड्डे करणारे गाव१२ महिने टँकर लागणारे गाव झाले समृद्धलॉकडाऊन काळात तालुक्याला भाजीपाला पुरवला

संजय पाटीलअमळनेर, जि. जळगाव : पाणी फौंडेशनच्या स्पर्धेत राज्यात तिसरे बक्षीस मिळवणाऱ्या आनोरे गावाला राष्ट्रीय जल पुरस्कार २०१९ चे देशात दुसरे बक्षीस मिळाले असल्याचा मेल पंचायत समितीला प्राप्त झाला आगव. ११ नोव्हेंबर रोजी दिल्ली मंत्रालयातून ऑनलाईन पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी दिली.      आनोरे गावाला सतत १२ महिने पाणीटंचाई असल्याने टँकर लागत होते. गावाने पाणी फाऊंडेशन च्या स्पर्धेत भाग घेतला आणि एकजुटीने संपूर्ण गाव कामाला लागले होते. गावाने प्रत्येक घराला सारखा रंग देऊन त्यावर पाणी बचाव, सामाजिक, राष्ट्रीय संदेश रेखाटले होते. प्रत्येक घरातील व्यक्तीने एकाच दिवशी शोष खड्डा खोदून एकाच दिवसात काम पूर्ण केले होते. प्रत्येक घराच्या धाब्यावरील पाणी जमिनीत जिरवण्यात आले होते. १०० टक्के वॉटर हार्वेस्टिंग करणारे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. गावाची एकजूट एव्हडी होती की शेताची बांध बंदिस्ती व शेततळी सामूहिक रित्या तर खोदले त्यातून मोठ्या प्रमाणात मृदा व जलसंधारण तर झाले. मात्र आधी श्रमदान करून सामूहिकरित्या एकाचवेळी मतदान करण्याचा विक्रमही आनोरे गावाने केला आहे. एक घर एक झाड हा उपक्रम राबवून गावाच्या प्रवेश वाटेवरदेखील झाडे लावण्यात आली होती.    दोन वर्षात गाव एव्हडे समृद्ध झाले की, एकेकाळी १२ महिने टँकर लागणारे गाव लॉकडाऊन काळात अमळनेर तालुक्याला भाजीपाला पुरवत होते. एव्हडे पाणी साचून बागायती व भाजीपाला उत्पन्न घेतले जात आहे. विहिरींची पाणी पातळी वाढली आहे.     जलमंत्रालयातर्फे देण्यात येणारा  राष्ट्रीय जल पुरस्कार  आनोरे गावाचा देशात दुसरा क्रमांक आला आहे. ११ नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरित होणार आहे.राष्ट्रीय जल पुरस्काराच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्रातून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील आनोरे व वाशीम जिल्ह्यातील बोरवा बुद्रुक  या दोनच गावांची निवड झाली होती. तेव्हा जलशक्ती मंत्रालयाच्या केंद्रीय भूमिजल बोर्डाच्या वैज्ञानिक आतीरा आर. यांनी प्रत्यक्ष आनोरे येथे येऊन पाहणी केली होती.

टॅग्स :WaterपाणीAmalnerअमळनेर