शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिम कॉलनीत सापडली जनावरांची कातडी; एमआयडीसी पोलिसांसह मनपाची कारवाई 

By सागर दुबे | Updated: April 8, 2023 17:05 IST

सु्प्रिम कॉलनीमधील ममता बेकरीजवळील एका गोडावूनमध्ये जनावरांची कातडींची साठवणूक करून ठेवण्यात आली असल्याची माहिती मिळाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : सुप्रिम कॉलनी येथील ममता बेकरीजवळील एका गोडावूनमध्ये शनिवारी दुपारी जनावरांची कातडी एमआयडीसी पोलिसांसह मनपाच्या पथकाला आढळून आली. या गोडावूनवर कारवाई करीत कातडी जप्त करण्यात आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, कातडीचे नमूने घेतले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.

सु्प्रिम कॉलनीमधील ममता बेकरीजवळील एका गोडावूनमध्ये जनावरांची कातडींची साठवणूक करून ठेवण्यात आली असल्याची माहिती एका व्यक्तीकडून एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या डायल ११२ क्रमांकावर देण्यात आली. पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी तेथे धाव घेऊन तातडीने या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी कार्यवाही सुरू केली. याची माहिती मनपाच्या मटन मार्केट विभागाला सुध्दा कळविण्यात आली. त्यानुसार मनपाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या व मनपाच्या पथकाने गोडावूनमध्ये जावून पाहणी केल्यानंतर त्यांना सुमारे ११०० ते १२०० नगर जनावरांची कातडी त्याठिकाणी आढळून आली.जेसीबी बोलवून गोडावून तोडले...पोलिसांसह मनपाच्या पथकाने कारवाई करून जेसीबी बोलवून गोडावूनचा काही भाग तोडून कातडी बाहेर काढून जप्त केली. याठिकाणी डॉक्टरांना बोलवून चाचणीसाठी कातडींचे नमूने घेण्यात आले. तसेच जप्त केलेली जनावरांची कातडी ही जमिनीत पुरविण्यात येणार असल्याचे मनपाच्या पथकाने सांगितले. ही कारवाई एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, दीपक जगदाळे, विकास सातदिवे, पंकज पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे यांच्यासह मनपाच्या पथकातील आरोग्य अधीक्षक जितेंद्र किरंगे, आरोग्य निरीक्षक विशाल वानखेडे, अधीक्षक संजय ठाकूर, किशोर सोनवणे  आदी कर्मचा-यांनी केली. याप्रकरणी सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.