शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

पशु सेवा हीच ईश्वर सेवा, हे जीवनध्येयच त्यांचे झाले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:00 PM

पशु अ‍ॅनिमल प्रोटेक्टशन असोसिएशन : १५ प्राण्यांना जीवनदान देवून दाखविली भूतदया

जळगाव : अपघातग्रस्त मनुष्यासाठी सारेच जण धावत असतात, पण विविध अपघात, नैसर्गिक आपत्ती यात जखमी होणाऱ्या पशू, पक्षी आणि प्राण्यांचे काय? त्यांच्या मदतीला कोणी पुढे येत नाही. जळगाव शहरातील पशु अ‍ॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशन ही विद्यार्थ्यांची संस्था याला अपवाद ठरते आहे़ मागील वर्षापासून ‘पशु अ‍ॅनिमल प्रोटेक्शन’ या संस्थेच्या सेवाभावी कार्यामुळे असंख्य प्राण्यांना अभय मिळाले आहे़ जखमी प्राण्यांची जबाबदारी स्वीकारून त्यांच्या योग्य उपचार करून त्यांची देखभाल ही संस्था करीत असल्याने पशु सेवा हिच ईश्वर सेवा, हे जीवनध्येयच त्यांचे झाले आहे़प्राण्यांची प्रचंड आवड असलेल्या शहरातील विद्यार्थ्यांनी काही वर्षांपासून ‘पशु अ‍ॅनिमल प्रोटेक्टशन असोसिएशन’ नामक संस्था स्थापन केली आहे़ गेल्या काही वर्षांपासून ही संस्था मोकाटा प्राण्यांच्या मदतीला धावून जात आहे़ त्यामुळे ही संस्था प्राण्यांचा आधार ठरली आहे़ लॉकडाऊन काळात मोकाट प्राण्यांना अन्न मिळत नसल्यामुळे या संस्थेतील विद्यार्थी त्या प्राण्यांच्या मदतीला सरसावले होते़ दिवसात शंभर ते दीडशे मोकाट कुत्र्यांना अन्न उपलब्ध करून देण्यात आले होते़ नुकतेच जमखी प्राण्यांची जबाबदारीही या संस्थेतील विद्यार्थ्यांनी उचलली आहे़ अपघातात जखमी झालेले व अत्यावस्थ अवस्थेत असलेले पशु, पक्षींवर या संस्थेतर्फे मोफत उपचार केले जात आहेत़१५० प्राण्यांना मिळाले जीवनदानमहामार्ग किंवा शहरातील रस्त्यांवर जखमी झालेले मोकाट कुत्रे, गायी तसेच इतर प्राण्यांबाबत माहिती मिळताच ही संस्था त्याठिकाणी जावून प्राण्यांवर उपचार करते़ तसेच उपचार केंद्रही स्थापन केले असून गंभीर जखमी असलेल्या प्राण्यांना केंद्रात नेवून त्यांच्यावर उपचार केले जाते़ वर्षभरात सुमारे दीडशे प्राण्यांना या संस्थेने जीवदान दिले आहे़रूग्णवाहिकाही लवकरच उपलब्धतात्काळ जखमी व अत्यावस्थ अवस्थेत असलेल्या मुक्या प्राण्यांना उपचार मिळावे यासाठी रूग्णवाहिका सुविधाही संस्थेच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ हे सेवाकार्य संस्थाध्यक्ष खुशबू श्रीश्रीमाळ, कोमळ श्रीश्रीमाळ, भवानी अग्रवाल, अनुज अग्रवाल, डॉ़ पंकज राजपूत, हर्षल भाटीया, अभिषेक जैन, राहुल थोरानी, राहुल कटपाल, भूमिका मंत्री, दिपांक्षू दोषी, नॅन्सी कटपाल, तेजू आर्या, रकक्षंदा परदेशी आदी करीत आहेत़ विशेष म्हणजे, मोकाट कुत्र्यांवर उपचार केल्यानंतर त्याची योग्यदेखभाल करणाºया मालकाचा ही संस्था शोध घेते व नंतर त्या कुत्र्याला संबंधित मालकाला सोपविले जाते़

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव