अमळनेर : विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील हे भाजपचे शिरीष चौधरी यांचा पराभव करून विजयी झाले आहेत.अनिल पाटील यांनी जिल्हा परिषद, बाजार समिती, जिल्हा बँक, नगरपरिषद अशा एकूण १६ निवडणुका लढवल्या असून दोनदा भाजपकडून विधानसभेतील पराभव वगळता त्यांनी नेहमी विजय मिळवला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
अमळनेरमधून अनिल पाटील विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 15:12 IST