धुळे : शहराचे आमदार अनिल गोटे यांना फोनवरून जिवानिशी मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा अलि संदेश ज्या क्रमांकाच्या सीमकार्डवरून आला आहे; त्या सीमकार्डधारकावर आझादनगर पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला. याबाबत आमदार अनिल गोटे यांनी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार, 9172704843 क्रमांकाच्या सीमकार्डधारकाने 19 नोव्हेंबरला मध्यरात्री 12.07 वाजेच्या सुमारास अनिल गोटे यांच्या भ्रमणध्वनीवर अलि संदेश टाकून गोटेंना जिवानिशी मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून त्या सीमकार्डधारकावर आझादनगर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 सह भादंवि कलम 507 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी करीत आहेत.
अनिल गोटेंना जिवानिशी मारण्याची धमकी
By admin | Updated: November 22, 2015 00:53 IST