भुसावळ : यूपीएससी परीक्षेत २८५ रँक मिळून अनिकेत सचान यांनी यश संपादन केले. याबद्दल सचान यांचा मुंबई येथे एका विशेष सोहळ्यात आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.नागरी सेवा परीक्षेत यश संपादन करण्यात येणाऱ्या उमेदवारांचा महाराष्ट्र विधान मंडळातर्फे गौरव सोहळा २५ रोजी झाला. त्यात वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी भुसावळचे अनिकेत सचान यांनी यश संपादन केले. याबद्दल हा सन्मान करण्यात आला. दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषद अध्यक्ष रामराजे निंबाळकर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सचान यांना सन्मानित करण्यात आले.
आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भुसावळच्या अनिकेत सचानचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 15:20 IST