शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तमाशा बंद पडल्याने संतप्त जमावाकडून दोघा पोलिसांना बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 19:03 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथील घटना: ४५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

मुक्ताईनगर/ कुºहा काकोडा (जि. जळगाव) : धामणगाव येथील यात्रेत तमाशा बंद पडल्याने प्रक्षोभक झालेल्या जमावाने बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या कुºहा दूरक्षेत्राच्या पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केला. या घटनेत दोन पोलीस शिपाई जखमी झाले असून एकाला उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी सुमारे ४५ आरोपींविरुद्ध पोलिसांना मारहाण करणे व शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून वृत्त असे की, ३० जानेवारी रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथे शेषनाग महाराजांची यात्रा होती. त्यानिमित्त कुºहा पोलीस चौकीचे नाईक संदीप खंडारे, शिपाई संजय लाटे, भगवान पाटील, सुरेश पवार हे बंदोबस्तासाठी तैनात होते. यात्रेत धुळेकर यांचा तमाशा सुरु असताना अचानक तमाशा बंद पडल्याने उमेश नामदेव राठोड, पंकज सरदार राठोड, लहू राजू राठोड, विलास नामदेव राठोड, अमोल प्रल्हाद धांडे, पंकज ममता चव्हाण, योगेश फकीरा राठोड, विशाल अशोक राठोड, रोशन सुधाकर सपकाळे, अनिकेत रवी पाटील, सत्यम राजू पाटील, दीपक वसंता चव्हाण, मुकेश ममता चव्हाण, राहुल अशोक राठोड, दीपक प्रकाश गोरे या रामराज्य ग्रुपच्या १५ जणांसह २५ ते ३० जणांनी आरडा ओरड करून तमाशा सुरु करा असे आयोजकांना सांगून गोंधळ घातला. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले असता त्याचा राग आल्याने वरील आरोपींनी पोलिसांवरच हल्ला केला. त्यांनी शिपाई भगवान पाटील यांना बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. मारहाणीत भगवान पाटील बेशुद्ध पडले होते. त्यांच्यावर जळगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिपाई सुरेश पवार यांना सुद्धा बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भगवान पाटील यांनी दिलेल्या फियार्दीवरून ४५ जणांविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उप निरीक्षक कैलास भारस्के करीत आहे.घटने दरम्यान गावातील वीजपुरवठा खंडितगुरुवारी रात्री ११.४५ वाजता जेव्हा पोलिसांवर हल्ला करण्यात आला तेव्हा अचानक गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. हल्लेखोरांनीच हा वीजपुरवठा खंडित केल्याची चर्चा आहे.