तमाशा बंद पडल्याने संतप्त जमावाकडून दोघा पोलिसांना बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 07:03 PM2020-01-31T19:03:48+5:302020-01-31T19:03:54+5:30

मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथील घटना: ४५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Angry mob kills two policemen after a showdown | तमाशा बंद पडल्याने संतप्त जमावाकडून दोघा पोलिसांना बेदम मारहाण

तमाशा बंद पडल्याने संतप्त जमावाकडून दोघा पोलिसांना बेदम मारहाण

Next

मुक्ताईनगर/ कुºहा काकोडा (जि. जळगाव) : धामणगाव येथील यात्रेत तमाशा बंद पडल्याने प्रक्षोभक झालेल्या जमावाने बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या कुºहा दूरक्षेत्राच्या पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केला. या घटनेत दोन पोलीस शिपाई जखमी झाले असून एकाला उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी सुमारे ४५ आरोपींविरुद्ध पोलिसांना मारहाण करणे व शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून वृत्त असे की, ३० जानेवारी रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथे शेषनाग महाराजांची यात्रा होती. त्यानिमित्त कुºहा पोलीस चौकीचे नाईक संदीप खंडारे, शिपाई संजय लाटे, भगवान पाटील, सुरेश पवार हे बंदोबस्तासाठी तैनात होते. यात्रेत धुळेकर यांचा तमाशा सुरु असताना अचानक तमाशा बंद पडल्याने उमेश नामदेव राठोड, पंकज सरदार राठोड, लहू राजू राठोड, विलास नामदेव राठोड, अमोल प्रल्हाद धांडे, पंकज ममता चव्हाण, योगेश फकीरा राठोड, विशाल अशोक राठोड, रोशन सुधाकर सपकाळे, अनिकेत रवी पाटील, सत्यम राजू पाटील, दीपक वसंता चव्हाण, मुकेश ममता चव्हाण, राहुल अशोक राठोड, दीपक प्रकाश गोरे या रामराज्य ग्रुपच्या १५ जणांसह २५ ते ३० जणांनी आरडा ओरड करून तमाशा सुरु करा असे आयोजकांना सांगून गोंधळ घातला. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले असता त्याचा राग आल्याने वरील आरोपींनी पोलिसांवरच हल्ला केला. त्यांनी शिपाई भगवान पाटील यांना बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. मारहाणीत भगवान पाटील बेशुद्ध पडले होते. त्यांच्यावर जळगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिपाई सुरेश पवार यांना सुद्धा बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भगवान पाटील यांनी दिलेल्या फियार्दीवरून ४५ जणांविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उप निरीक्षक कैलास भारस्के करीत आहे.
घटने दरम्यान गावातील वीजपुरवठा खंडित
गुरुवारी रात्री ११.४५ वाजता जेव्हा पोलिसांवर हल्ला करण्यात आला तेव्हा अचानक गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. हल्लेखोरांनीच हा वीजपुरवठा खंडित केल्याची चर्चा आहे.

Web Title: Angry mob kills two policemen after a showdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.