चोपडा, जि.जळगाव : तालुक्यातील चहार्डी येथील अंगणवाडी इमारतीअभावी कुडाच्या छताखाली भरत आहे.चहार्डी येथील प्लॉट वस्ती भागात गेल्या अनेक वर्षांपासून मिनी अंगणवाडी सुरू आहे. मात्र या अंगणवाडीला इमारत नसल्याने उघड्यावर भरत असते. सध्या गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस सुरू असल्याने शेळ्या आणि गुरे बांधले जाणाऱ्या कुडाच्या छताखाली भरते आहे. म्हणून एकात्मिक प्रकल्प विभागाचे वाभाडे यातून दिसून येत आहेत.सध्या महाराष्ट्रभर अंगणवाड्यांमार्फत अनेक लाभाच्या योजना राबविल्या जातात. मात्र चहार्डी, ता.चोपडा येथे वेले रस्त्याकडे असलेल्या प्लॉट वस्ती भागात मिनी अंगणवाडी भरते. या भागात सर्व आदिवासी समाजातील नागरिकांचे वास्तव्य आहे. म्हणून या मिनी अंगणवाडीत येणाºया लहान चिमुकल्यांना बसण्यासाठी स्वतंत्र इमारत अजूनही बांधली नाही. कधी झाडाच्या सावलीत तर कधी कुडाच्या झोपडीत तर कधी कुडाच्या छताखाली ही बालके बसवली जातात.या अंगणवाडीसाठी मनीषा ढोले (भोई) या सेविका म्हणून काम करतात. या अंगणवाडीसाठी पंचायत समितीकडे वारंवार इमारतीची मागणी करूनही दुर्लक्ष केले जाते म्हणून कायमस्वरूपी या मिनी अंगणवाडीत विद्यार्थी बिनछताच्या किंवा कुडाच्या छताखाली बालकांना बसविले जाते आणि तिथेच त्यांना आहार दिला जातो. अशा परिस्थितीत येथे इमारतीसाठी अनुदान मिळणे गरजेचे आहे. या वस्ती भागातील आदिवासी ग्रामस्थांनी नवीन इमारत बांधून मिळण्याची मागणी केली आहे.
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे अंगणवाडी भरते कुडाच्या छताखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 16:19 IST
चहार्डी येथील अंगणवाडी इमारतीअभावी कुडाच्या छताखाली भरत आहे.
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे अंगणवाडी भरते कुडाच्या छताखाली
ठळक मुद्देअंगणवाडीला इमारत नसल्याने कधी उघड्यावरउपाययोजना करण्याची गरज