शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

...अन्‌ जिल्हाधिकाऱ्यांच्या झोपेचा ‘हिशेब’ चुकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 19:30 IST

 ‘हिशेब’ जुळविण्यासाठी ३१ मार्चचा मुहूर्त टळायला नको, यादृष्टीने जिल्हा नियोजन, कोषागार व जिल्हाधिकारी कार्यालय शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरुच होते.

कुंदन पाटील/जळगाव

जळगाव :

 ‘हिशेब’ जुळविण्यासाठी ३१ मार्चचा मुहूर्त टळायला नको, यादृष्टीने जिल्हा नियोजन, कोषागार व जिल्हाधिकारी कार्यालय शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरुच होते. त्यामुळे ताळमेळ जुळविण्यासाठी रात्री दहाच्या ‘हिशेबात’ असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना झोपमोडशिवाय पर्याय उरला नाही. त्यांनी शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजता कोषागार कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. दरम्यान, या विभागात बिलांचे सादरीकरण सुरुच राहिल्याने सुमारे अडिच देयकांचे धनादेशाद्वारे करण्यात येणार आहे.

शुक्रवारी दिवसभर जिल्हाधिकारी, जि.प., कोषागार, जिल्हा नियोजन समिती, मनपासह अन्य कार्यालयात ३१ मार्चच्या हिशेबातच व्यस्त होते. दुपारनंतर देयकांसह बिलांचे सादरीकरणाचा आकडा फुगत गेला. परिणामी या देयकांसह बिलांची रकम वर्ग करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची कसरत सुरु झाली. तशातच जिल्हा कोषागार कार्यालयात आलेल्या ३०० ऑनलाईन देयकांना तत्काळ निकाली काढण्यात आले. रात्री उशीरा आलेल्या सुमारे २५० देयकांपोटी दि.३१ रोजीच्या तारखेनुसार धनादेशाद्वारे रकम अदा केली जाणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांचे ‘जागते रहो’...१०० टक्के निधी खर्च झाल्याचा दावा प्रत्यक्षात साकारण्यासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल मध्यरात्रीपर्यंत कार्यालयातच बसून होते. दिवसभर ते जिल्हा नियोजन समितीच्या संपर्कात होते. तसेच सादर झालेल्या बिलांचा आढावाही घेत होते. कोषागार कार्यालयात ३१ मार्चच्या सायंकाळी देयकांसह बिलांची शेकडो प्रकरणे दाखल झाली. त्यामुळे या कार्यालयातील मनुष्यबळाला चांगली कसरत करावी लागली. ‘झेडपी’ लेटलतीफउशीराने बिले, देयके, अनुदानांची प्रकरणे सादर करण्यात जिल्हा परिषद ‘लेटलतीफ’ ठरली आहे. त्यापाठोपाठ जिल्हा रुग्णालयाकडून काही प्रस्ताव उशीराने दाखल झाले. जिल्हा नियोजन समितीकडूनही विविध विकास कामांच्या खर्चापोटी आलेल्या प्रस्तावांची संख्याही मोठी होती.