शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
4
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
5
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
6
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
7
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
8
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
9
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
10
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
11
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
12
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
13
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
14
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
15
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
16
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
17
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!
18
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
19
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
20
Saif Ali Khan : "तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर

‘अनकही...’ साहिर व मीराची काव्यमय प्रेम कहाणी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2017 18:34 IST

या काव्यमय प्रेम कहाणीमध्ये जळगावच्या तन्वी आनंद मलारा यांनी प्रमुख नायिकेची भूमिका साकारली असून अवघ्या दोन दिवसात यु-ट्यूबवर ४५० प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.

-Ravindra Moreआयुष्यात प्रेम आणि करिअर या दोन्ही जबाबदारी पार पाडत असताना मनातील अव्यक्त भावना ‘अनकही’ या साडे बारा मिनिटांच्या लघुपटात साहिर व मीराने मांडली आहे. या काव्यमय प्रेम कहाणीमध्ये जळगावच्या तन्वी आनंद मलारा यांनी प्रमुख नायिकेची भूमिका साकारली असून अवघ्या दोन दिवसात यु-ट्यूबवर ४५० प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.काय आहे काव्यमय प्रेमकहाणी...लघुपटात साहिरच्या भूमिकेत अजिंक्य पाटील तर मीराच्या भूमिकेत तन्वी मलारा आहे. साहिर याला कविता व शेरो शायरीची आवड आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम असताना मीराचे वडिल तिनेआयएएसबनावेयासाठी दिल्ली येथे पाठविण्याचा निर्णय घेतात. जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आणि त्याचबरोबर साहिरसोबत विवाह हे दोनच ध्येय आयुष्यात असल्याचे मीरा निरोप घेतेवेळी सांगते.साहिरच्या हाताने सिंदूरभरल्यानंतर एक वर्षाने परत येण्याचे वचन देत मीरा दिल्लीला रवाना होते. दरम्यान, काहीवर्षांचा कालावधी लोटल्यानंतर साहिरचा शोध घेत मीरा त्याच्या घरी पोहचते. गतकाळातील आठवणींना उजाळा दिल्यानंतर परस्परांच्या वैवाहिक आयुष्याबाबत विचारणा करतात. त्यातच मीरा साहिरचा निरोप घेते आणि लघुपट संपतो.लघुपटातील संगीत आणि फ्लॅश बॅक अप्रतिमसाडे बारा मिनिटाच्या या लघुपटात दिग्दर्शक श्रवण खरात यांनी दृष्यांना साजेसे हिंदी चित्रपटांचे गीत घेतलेआहेत. त्यासोबतच मीरा आणि साहिर यांच्या गतकाळातील दृष्यांचे अप्रतिम चित्रण करण्यात आले आहे. ५ ते ८ एप्रिल दरम्यान पुणे येथे एनआयबीएम रस्त्यावरील एका बंगल्यात या लघुपटाचे शुटींग झाले आहे. या लघुपटाचे लेखक टिकम शेखावत हे स्वत: कवी असून साहिरच्या पात्राद्वारे त्यांनी शेरोशायरी व कविता सादर केल्या आहेत."अनकही या लघुपटात साहिर व मीरा यांची काव्यमय प्रेमकहाणी चित्रित करण्यात आली आहे. प्रेम आणि करीअर यासोबत दोघांच्या मनातील व्यक्त न झालेली भावना या लघुपटाद्वारे मांडली आहे. आगामी काळात ‘प्यार एक तरफा’ सह अन्य लघुपटांमध्ये काम करणार आहे."-तन्वी मलारा, नायिका, अनकही.दोन दिवसात ४५० दर्शकांनी दिली पसंती‘अनकही’ या लघुपटाचे मंगळवारी अनावरण करीत यु-ट्यूबवर अपलोड करण्यात आला. या दरम्यान दोन दिवसात ४५० दर्शकांनी या लघुपटाला पसंती दिली आहे. तर फेसबुकवर देखील १०० पेक्षा जास्त नागरिकांनी शेअर केला आहे.  आगामी काळात ‘प्यार एक तरफा’ या लघुपटाच्या निमित्ताने तन्वी मलारा प्रमुख नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.