शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार केळी उत्पादकांच्या खात्यावर पडणार ३७८ कोटींची रक्कम!

By ajay.patil | Updated: November 3, 2023 19:09 IST

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार केळी उत्पादकांच्या खात्यावर पडणार ३७८ कोटींची रक्कम!

जळगाव - हवामानावर आधारीत फळ पीक विम्याच्या दोन महिन्यांपासून प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. केळीच्या नुकसानभरपाईची वाट पाहत असलेल्या जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अखेर गोड होणार असून, आठवडाभरात जिल्ह्यातील ५३ हजार ९५१ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३७८ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम पडणार असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे.

हवामानावर आधारीत फळ पीक विम्याची रक्कम दर वर्षाला १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पडते. यावर्षी मात्र, विमा कंपनीने केळी उत्पादकांच्या केळी लागवड क्षेत्राच्या पडताळणीचा घाट घातल्यामुळे १५ सप्टेंबरची मुदत संपल्यावर देखील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरभाईची रक्कम पडलेली नव्हती. याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील यांचा पाठपुरावा सुरु होता. दिवाळीच्या आधी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर केळी पीक विम्याची रक्कम पडणार आहे.

५३ हजार शेतकऱ्यांना मिळणार ३७८ कोटींची भरपाई..जिल्ह्यातील ७७ हजार ८३२  केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी कमी ५३ हजार ९५१ केळी उत्पादक शेतकरी केळी पीक विम्यासाठी पात्र आहेत. कमी व जास्त तापमानाच्या निकषात जिल्ह्यातील ८६ महसूल मंडळांपैकी ५५ महसूल मंडळं पात्र ठरली होती. गेल्या वर्षी लागवड झालेल्या केळीच्या लागवड क्षेत्राबाबत विमा कंपनीने आक्षेप घेतला होता. त्यानंतर जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्राची पडताळणी देखील करण्यात आली. पडताळणीनंतर जिल्ह्यातील ५३ हजार ९५१ केळी उत्पादक शेतकरी विम्यासाठी पात्र ठरले आहेत.

केळी पीक विम्याच्या प्रलंबित विषयाबाबत पाठपुरावा सुरु होता. गुरुवारी पुणे येथील कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिकी यांच्यासोबत चर्चा झाली. जिल्ह्यातील ५३ हजार ९५१ केळी उत्पादक पीक विम्यासाठी पात्र ठरले असून, आठवडाभरात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची ३७८ कोटी ३० लाखांची रक्कम पडणार आहे. यासाठी कोणतीही पडताळणी होणार नाही. तसेच प्रलंबित शेतकऱ्यांचाही प्रश्नाबाबत पाठपुरावा सुरु आहे.- उन्मेष पाटील, खासदार

टॅग्स :BananaकेळीJalgaonजळगाव