शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

जळगावच्या मेहरुण तलावासाठी ‘अंबरझरा’ ठरतोय ‘भगीरथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:08 IST

वैभव टिकविण्यासाठी सरसावले पर्यावरणप्रेमी

जळगाव : शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावाचे पाण्याचे स्त्रोत या परिसरात वाढलेल्या बांधकामामुळे दिवसेंदिवस कमी होत असताना मेहरुण तलावासाठी ब्रिटीशकालीन अंबरझरा तलाव भगीरथ ठरत आहे. सध्या याच अंबरझरा तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने मेहरुण तलाव जवळपास ५० टक्के भरला आहे. विशेष म्हणजे अंबरझरातून वाया जाणारे पाणी मेहरुण तलावाकडे वळविण्यासाठी शहरातील मराठी प्रतिष्ठान व इतर पर्यावरणप्रेमी सरसावल्याने शहराचे वैभव जतन होण्यास मदत होत आहे.मेहरुण तलाव हा पूर्वीपासूनच शहरवासीयांचे खास आकर्षण केंद्र असून त्याचे जतन करण्यासाठी मनपाकडून विविध उपाययोजना करण्यासह पर्यावरणप्रेमीही हातभार लावत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात या भागात बांधकाम वाढल्याने तलावाच्या स्त्रोतावर मोठा परिणाम झाला. पावसाळ््यात तलावामध्ये लांडोरखोरीसह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी येत असे, मात्र बांधकाम वाढल्याने हे स्त्रोत इतरत्र वळले आहे. परिणामी तलावामध्ये पाण्याचे प्रमाण कमी-कमी होत आहे, असे असले तरी यंदा सुखद बाब म्हणजे तलावाला ब्रिटीशकालीन अंबरझरा तलावाचा मोठा आधार झाला.वाया जाणाऱ्या पाण्यापासून तयार झाला अंबरझरावनविभागाच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात पाणी परिसरात वाहून जात होते. मात्र त्या वेळी हेच पाणी अडविले तर त्याचा फायदा होऊ शकतो हे ओळखून दीडशे वर्षापूर्वी ब्रिटिशांनी त्या भागात तलाव तयार केला.त्याला त्यावेळी घाडगे तलाव म्हणून ओळखले जावू लागले व नंतर त्यास अंबरझरा तलाव असे नाव देण्यात आले. या तलावाला साखळीचे दोन फाटकही बसविण्यात आले व हिवाळ््यात हे फाटक उघडून मेहरुण तलावात पाणी सोडण्यात येत असे.अंबरझरा तलावाच्या दुरुस्त केलेल्या या चाºया काही वर्षात सखल होत गेल्या व पुन्हा हे पाणी आजूबाजूला वाहून जात असे. मात्र गेल्यावर्षी मराठी प्रतिष्ठान व इतर संस्थांनी पुढाकार घेत विजय वाणी व इतरांनी या चाऱ्यांची तसेच फाटकांची दुरुस्ती केली. त्यामुळे मेहरुण तलावात पाण्याचा स्त्रोत वाढला. यावर्षी पुन्हा प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, मेहरुणचे प्रशांत सोनार, वृक्षसंवर्धन समितीचे चंद्रशेखर नेवे यांनी पुन्हा अंबरझरा तलावावर जाऊन तेथून ते मेहरुण तलावापर्यंत चार कि. मी. लांबी व १५ फूट खोलीची चारी तयार केली. त्यामुळे आता पुन्हा अंबरझºयातील खळखळाट मेहरुण तलावाकडे वळला आहे. यासाठी मराठी प्रतिष्ठानने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना विनंती केली व महाजन यांनी यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली. सोबतच तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता व्ही. डी. पाटील यांनी यासाठी मार्गदर्शन केले. त्यातून तंत्रशुद्ध चाºया तयार झाल्या असून मेहरुण तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्त्रोत वाढला आहे. सध्या वाढत्या बांधकामामुळे मेहरुण तलावाचे इतर स्त्रोत बंद झाले असले तरी या चाºयांमधून मोठ्या वेगाने पाणी मेहरुण तलावात येत असल्याचे सुखद चित्र यंदा पाहवयास मिळत आहे.सिमेंटचेकॅनॉल तयार करणारअंबरझरापासून ते मेहरुण तलावापर्यंत सध्या चाºया तयार केल्या असल्या तरी पुढीलवर्षी जिल्हा नियोजन विकास समितीकडून निधी मिळवून या ठिकाणी सिमेंटचे कॅनॉल तयार करून त्यावर चार-पाच ठिकाणी छोटे पूल तयार करण्याचे प्रयत्न राहणार असल्याचे व्ही.डी. पाटील यांनी सांगितले. यंदा मेहरुण तलाव १०० टक्के भरल्यानंतर त्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते जलपूजन करण्याचा मनोदय असल्याची माहिती विजय वाणी यांनी दिली.‘लोकमत’ने केले होते वृत्त प्रकाशितमेहरुण तलावासाठी मुख्य स्त्रोत असलेल्या अंबरझरा तलावाकडून मेहरुणकडे येणाºया पाटचारीच्या दुर्दशेबाबत गेल्यावर्षी‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतरही मराठी प्रतिष्ठानने पुढाकार घेत पाटचारीची सफाई व खोलीकरण केले होते.दुर्लक्षित तलावाच्या चारी केल्या दुरुस्तअंबरझरा तलाव व त्याच्या चाºया दुर्लक्षित झाल्याने मेहरुणचा हा मोठा स्त्रोत बंद झाला. यामुळे अंबरझरातील पाणी मंगलपुरी व औद्योगिक वसाहत परिसरात वाहून जात होते. १९९२मध्ये तत्कालीन उपनगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, बांधकाम समिती सभापती विजय वाणी, पी.व्ही माळी, अभियंता बी.जे. सूर्यवंशी यांनी पाहणी केली व तलावाची चारी दुरुस्त केली आणि एक संरक्षक भिंत बांधली. त्यामुळे पाणी तलावात येऊ लागले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव