शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

आम आदमी पक्षावर संशोधन, अमळनेरच्या पोलिसाने मिळविली पीएच.डी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:55 IST

राजकीय विषयावर डॉक्टरेट

अमळनेर : येथील पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेचे अंमलदार शरद तुकाराम पाटील यांनी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. ही पदवी मिळविणारे ते पोलीस दलातील तिसरे तर राजकीय विषयावर डॉक्टरेट मिळविणारे एकमेव पोलीस आहेत. ‘भारतीय राजकारणातील नवे प्रवाह, विशेष संदर्भ : आम आदमी पक्ष’ या विषयावर त्यांनी संशोधन केले.शरद हे चौथीत असतानाच त्यांचे वडील वारले. संसाराचा सर्व भार आईवर येऊन पडला. त्यामुळे शरद व त्यांचे मोठे बंधू शिक्षणासोबतच पार्टटाईम जॉबही करू लागले होते. दहावीत त्यांना ७२ टक्के मिळाले. त्यानंतर त्यांनी आय. टी. आय. (फिटर) केले. त्यातही ७१ टक्के गुण मिळाले. त्याबरोबरच वायरमनचा कोर्स व सीएनसी (कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल)चा कोर्स केला. एक वर्ष केबीएक्स कंपनीत काम केले. २०१६मध्ये ते उपनिरीक्षक पदाची परिक्षा उत्तीर्ण झाले.त्यानंतर पीएच. डी. करण्याची इच्छा झाली. त्यासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा (पेट) ही उत्तीर्ण झाले. नोकरी व संसार सांभाळून डॉक्टरेट होणे सोपे नव्हते. मात्र प्रताप महाविद्यालयातील पीएच. डी.चे गाईड प्रा. डॉ.विजय तुंटे यांनी शरद यांचा आत्मविश्वास वाढविला. यशाचे श्रेय पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपअधीक्षक राजेंद्र ससाणे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना देतात.अपयश हीच पहिली पायरी अन् दुसरी पायरी यशाचीउपनिरीक्षक पदाची परिक्षा देताना पहिल्या प्रयत्नात थोडक्यात यशाने हुलकावणी दिली. ते काहीसे उदास झाले, मात्र खचले नाहीत. २०१६मध्ये त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. विशेष म्हणजे अवघ्या एका महिन्याच्या अभ्यासात ते ही परीक्षा उत्तीर्ण झाले. काही तांत्रिक अडचणींमुळे शरद यांच्या डोक्यावर उपनिरीक्षकाची कॅप व खांद्यावर स्टार लागणे बाकी आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव