शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

अमळनेरचे डिवायएसपी राजेंद्र ससाणे यांचा कार अपघातात मृृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 16:34 IST

दरीत कोसळली कार : नाशिकला घरी जाताना काळाने घातला घाला

अमळनेर : येथील पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र ससाणे हे खाजगी गाडीने नाशिक येथे घरी जात असताना त्यांची कार झाडावर आदळून १५० फूटन खोल दरीत कोसळल्याने ससाणे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत हऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना वडाळी भोई गावाच्या पुढे ११ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.राजेंद्र ससाणे हे नाशिक चे रहिवाशी होते. गुरुवार, शुक्रवार रजा व शनिवार, रविवार शासकीय सुटी घेऊन ते दवाखान्यात नियमित तपासणी करण्यासाठी नाशिकला जात होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास ते अमळनेरहून निघाले होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. दीड वाजेच्या सुमारास त्यांची कार वडाळी भोई जवळ झाडावर जोरात आदळली. झाड तोडून कार पुढे गेली व खालीकोसळली. घटनेचे वृत्त कळताच चांदवड टोल प्लाझा वरील कर्मचारी मयूर तेथे हजर झाला. यावेळी त्याने खिशातून ओळखपत्र काढले असता ते डीवायएसपी ससाणे असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर ताबडतोब अमळनेरलाही माहिती कळली. तेथील पोलीस अधिकारी कोमलसिंग पाटील यांनी ससाणे यांचे शव विच्छेदनासाठी चांदवड येथील शासकीय रुग्णालयात नेले. ते अत्यंत साध्या स्वभावाचे , प्रामाणिक व न्याय देणारे अधिकारी म्हणून परिचित होते.