शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात काही तासात चार ट्रॅक्टरवर कारवाई, वाहन पळवणारे दोन अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 21:22 IST

काही तासात चार ट्रॅक्टरवर कारवाई करून वाहन पळवणाऱ्या दोन जणांंना अटक करण्यात आली.

ठळक मुद्देवाळू चोरांची मुजोरी थांबवण्यासाठी संयुक्त कारवाई कराबैठकीत प्रांतांचे आदेश

संजय पाटीलअमळनेर : तालुक्यात वाळू चोरीचे प्रमाण वाढले असून, वाळू चोरट्यांची मुजोरी थांबवण्यासाठी पोलीस, महसूल आणि आरटीओ अशा तिन्ही विभागातर्फे संयुक्त कारवाई करा, असे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी बैठकीत देताच अवघ्या काही तासात अमळनेरात अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई करण्यात आली. काही तासात चार ट्रॅक्टरवर कारवाई करून वाहन पळवणाऱ्या दोन जणांंना अटक करण्यात आली.१९ रोजी सकाळी अकराला प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी त्यांच्या दालनात बैठक घेतली. यावेळी डीवायएसपी राकेश जाधव, तहसीलदार मिलिंद वाघ, आरटीओ विकास सूर्यवंशी,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, मारवडचे सपोनि राहुल फुला, पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, राजेंद्र माळी, राहुल लबडे आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी अहिरे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे यांनी वाळूमाफियांना वेसन घालण्यासाठी दिलेल्या आदेशाचा संदर्भ घेत अमळनेरात २४ तास वाळूचे टेम्पो सुरू असून, ट्रॅक्टर व डम्परदेखील जोरात सुरू आहेत, पर्यावरणाचा ऱ्हास करून चोरत्यांनी महसूल कर्मचारी व नागरिकांनादेखील दादागिरी सुरू केली आहे. त्यांची मुजोरी थांबवा, तिन्ही विभागातर्फे संयुक्त कारवाई करा, असे आदेश दिले.गेल्या काही दिवसांपासून वाळू चोरांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, टेम्पोवर कठोर कारवाई न करता सोडून देणे, काही वाहने रस्त्यात सोडून देणे असे प्रकार घडत होते. तक्रार केल्यानंतरही वेळेवर न पोहचल्याने वाळू चोरांना पळण्याची संधी मिळणे, रात्री नाईट राऊंडला वाळू चोरांच्या खबरीकडे दुर्लक्ष करणे, विनानंबरच्या टेम्पोंवर कारवाई न करता सोडून देणे आदीबाबत सामान्य नागरिकांची ओरड होती. मात्र तक्रारदारांना वाळू चोरांकडून त्रास व्हायचा. परंतु कारवाई होत नव्हती. म्हणून नागरिकांत भीती निर्माण झाली होती. मात्र जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व प्रांताधिकारी यांनी कठोर पावले उचलली आणि बैठकीनंतर अवघ्या काही तासात तहसीलदार मिलिंद वाघ यांनी पोलीस व आरटीओ यांना सोबत घेऊन लगेच चार वाहनांवर कारवाई केली आहे.संयुक्त पथकाने पारोळा रोड, फापोरे रोड आदी भागात छापे टाकले. अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी प्रवीण पाटील यांचे एमएच-२७-बीबी-२८४७, जावेद पठाण यांचे एमएच-१९-एएन-३११२, संतोष पवार त्यांचे जेएटी ४३८, तर नोंदणी नसलेले सुलतानखान रहीमखान यांचे ट्रॅक्टर पकडून त्यांना अमळनेर एसटी आगारात जमा करण्यात आले आहे.वाहन पळवणाऱ्या दोघांना अटकदरम्यान, तहसील कार्यालयात जमा केलेला महेंद्र महाजन यांचा लाल रंगाचा टेम्पो तहसील आवारातून पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्हेरे येथील श्यामकांत नरेंद्र पाटील व पुंडलिक साहेबराव पाटील यांना तहसीलदार मिलिंद वाघ, मंडलाधिकारी पुरुषोत्तम पाटील, संदीप पाटील यांनी रंगेहात पकडले. दोघांच्या तोंडातून दारूचा वास येत होता. संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, कैलास शिंदे तपास करीत आहे.

टॅग्स :sandवाळूAmalnerअमळनेर