शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर पंचायत समितीच्या कारभाराबाबत कारवाईचा प्रस्ताव पाठविणार - पंचायत राज समितीचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 13:44 IST

समितीने घेतला पाणीपुरवठा, आरोग्य विभाग, स्वच्छतेचा आढावा

ठळक मुद्देग्रामपंचयतींच्या दप्तरी तपासणीअमळनेर येथे गटविकास अधिका:यांना स्वत:चा पगार सांगता आला नाहीपंचायत समितीचे उत्पन्न आले नाही

संजय पाटील, महेंद्र रामोसे / ऑनलाईन लोकमत

अमळनेर, जि. जळगाव, दि. 26 -  जळगाव दौ:यावर असलेल्या पंचायत राज समितीच्या सदस्यांनी गुरुवारी अमळनेर तालुक्यात भेट देऊन तेथील विविध विभागाचा आढावा घेतला. यामध्ये अमळनेर येथे गटविकास अधिका:यांना स्वत:चा पगार तसेच पंचायत समितीचे उत्पन्न सांगता आले नाही. सर्व विभागाच्या अहवालाबाबत  अधिका:यांना उत्तर देता आले नाही. या पं.स.चा कारभार बरोबर नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे समितीने पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

जळगावहून येताना म्हसले , टाकरखेडा, कुरहे खु या गावांना भेटी देऊन पाणी पुरवठा योजना तसेच ग्रामपंचयतींच्या दप्तरी तपासणी केली.  कु:हे खुर्द येथे 2007ची पाणी पुरवठा योजना प्रलंबित होती तत्कालीन समितीने 40 टक्के काम करून पैसे काढून घेतले होते. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ठेकेदार बदलवून योजना पूर्ण केली असून त्यात पाणी जोडणे बाकी आहे. या कामाची समितीने पाहणी व मोजणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केले. मात्र एका महिन्यात पाणी सुरू करण्याचा अल्टीमेटम दिला  आहे. ग्रामपंचायत दप्तराचे तपासणी करून समितीने ग्रामसेवका पंचायत समितीमध्येमध्ये बोलावले. टाकरखेडा येथे पाणी टंचाई असल्याने नवीन योजनेचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना समितीने केल्या. ग्रामपंचायतीत स्वच्छतेची पाहणी करून ग्रामस्थांना बोलावून त्यांच्याशी संवाद  साधला. ग्रामसेवक बाबत काही तक्रारी आहेत का असेही विचारले, मात्र आरोग्य केंद्रात औषधी नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.  यामध्ये वरिष्ठ पातळीवरून औषधी येत नसल्याचे समोर आले. प्राथमिक शाळेतही जाऊन चौकशी केली पोषण आहाराचा अहवाल घेतला. म्हसले येथे पाणी पुरवठय़ाचा अहवाल घेऊन पाणी मिळते की नाही याची चौकशी केली. यानंतर समिती अमळनेर येथे पोहचली. या ठिकाणी माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, सुशील भदाणे आदींनी वरिष्ठ व निवड श्रेणी बाबत निवेदन दिले. त्यानंतर जानवे येथील बाळू मिस्त्री यांनी  समस्यांबाबत ग्रामसेवक ऐकत नाही अशी तक्रार केली. समितीने सर्व विभागांचा बंद द्वार अहवाल घेतला. नंतर जानवे येथील तक्रारदार व ग्रामसेवक यांना समक्ष बोलावण्यात आले स्वच्छते बाबत संबंधित अधिका:यांची कानउघडणी केली. समितीत आमदार विक्रम काळे, दत्ता सामंत, श्रीकांत देशपांडे, प्रकल्प संचालक विक्रांत बगाडे,  अशोक पटाईत,  डी.जी. तांबोळी, सुनील मोरे, धीरज बोरसे यांचा समावेश आहे.