अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर होत नाही, तोपर्यंत पुढाऱ्यांना  गावबंदी !

By संजय पाटील | Published: November 3, 2023 10:56 AM2023-11-03T10:56:54+5:302023-11-03T10:57:18+5:30

जानवे ग्रामस्थांनी गावात लावला फलक 

amalner taluka is not declared drought stricken until the leaders are banned | अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर होत नाही, तोपर्यंत पुढाऱ्यांना  गावबंदी !

अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर होत नाही, तोपर्यंत पुढाऱ्यांना  गावबंदी !

संजय पाटील, अमळनेर जि.जळगाव : शासनाने दुष्काळी तालुक्याची यादी जाहीर केली.   त्यात अमळनेर तालुक्याचा समावेश नाही. तालुका दुष्काळी जाहीर होत नाही, तोपर्यंत पुढाऱ्यांना  गावबंदी करण्याचा निर्णय जानवे ता.अमळनेर येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

या आशयाचे निवेदन तहसीलदाराना देण्यात आले. अमळनेर तालुक्यात सुरुवातीला सलग ४२ दिवस पाऊस पडलेला नाही.  पाण्याअभावी पिके करपली. शेतकऱ्यांना उत्पन्न आलेले नाही. कापूस, मका ,ज्वारी,उडीद मुग पिकांचे नुकसान झाले आहे. पीक विमा मिळाला नाही. तरीही शासनाने जाहीर केलेल्या यादीत अमळनेर तालुक्याचा समावेश नाही.

जोपर्यंत अमळनेर तालुक्याचे नाव दुष्काळी यादीत येत नाही,  तोपर्यंत राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात येण्यास बंदी करण्यात येत आहे. कोणी प्रवेश केला तर अपमान करण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन जिल्हाधिकारी ,तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे. याबाबत गावात फलक लावण्यात आला आहे. 

निवेदनावर कल्पेश पाटील, शिवाजी पाटील, अशोक बोरसे, समाधान पाटील, शरद पाटील, ललिता पाटील, सरलाबाई पाटील, विजय पाटील , मधुकर पाटील, दगडू पाटील, ईश्वर पाटील ,भुपेश पाटील, प्रकाश पाटील ,  यांच्यासह १०८ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Web Title: amalner taluka is not declared drought stricken until the leaders are banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Amalnerअमळनेर