शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीनंतर अवघ्या ३० मिनिटातच आटोपला अमळनेरचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:34 IST

जळगाव - उदय वाघ व त्यांच्या समर्थकांनी मेळाव्यात केलेल्या मारहाणीनंतर मेळाव्याला सुरुवात झाली. यात गुलाबराव पाटील व गिरीश महाजन ...

जळगाव - उदय वाघ व त्यांच्या समर्थकांनी मेळाव्यात केलेल्या मारहाणीनंतर मेळाव्याला सुरुवात झाली. यात गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात वाघ दाम्पत्याला चांगल्याच कानपिचक्या घेतल्या. अवघ्या ३० मिनिटात हा मेळावा आटोपण्यात आला.अमळनेर येथील मेळाव्यात गोंधळ घालणाऱ्या काही कार्यकर्त्यांना तत्काळ मेळाव्याचा ठिकाणावरून बाहेर काढले. त्यानंतर उमेदवार उन्मेष पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांतता पाळण्याचे आवाहन केले.आमच्यावर जास्त अन्याय झाला, तरीही आम्ही प्रचारात - गुलाबराव पाटीलगुलाबराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, भाजपाने आतापर्यंत शिवसेनेवर अनेक अन्याय केले आहेत. तरीही आम्ही आमच्या नेत्यांचा आदेशानंतर भाजपा उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झालो आहोत. कारण पक्ष व पक्षप्रमुख यांनी आम्ही केलेल्या कामासाठी पक्षाने नेहमीच पदे दिले आहेत. त्यामुळे एकावेळेसच पक्षाने नाकारले म्हणून अन्यायाची भावना मनात न ठेवता पक्षासाठी काम केले पाहिजे असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच भुसावळच्या सभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भर सभेत राजेंद्र दायमा यांचे तिकीट कापून त्यांच्याऐवजी दिलीप भोळे यांना उमेदवारी दिली. तरीही दायमा यांनी पक्षाचे काम केल्याची आठवण देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी केली.भविष्यात देखील पक्षाकडून काही चांगलेच मिळणार - गिरीश महाजनगिरीश महाजन म्हणाले की, या प्रकारे वाद घालून अन्याय किंवा अपमान झाल्याची भावना व्यक्त होत नाही. पक्षाने आतापर्यंत आपण केलेल्या कार्याला नेहमीच न्याय व सन्मान दिला आहे. भविष्यात देखील आपल्याला पक्षाकडून नेहमीच चांगलेच मिळत राहील. यासाठी निराश नव्हता पक्षाचे काम करणे गरजेचे असल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव