शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या घटनेनं हादरलं अमळनेर! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 08:06 IST

चारित्र्याचा संशय घेत ३५ वर्षीय विवाहित महिलेचा पतीने गळा दाबून खून केल्याची घटना ८ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील मुंबई गल्लीत घडली.

जळगाव

चारित्र्याचा संशय घेत ३५ वर्षीय विवाहित महिलेचा पतीने गळा दाबून खून केल्याची घटना ८ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील मुंबई गल्लीत घडली. देविदास उर्फ सूर्यकांत आत्माराम चौधरी असे आरोपीचे नाव असून आरोपीने सुरुवातीला महिलेने आत्महत्या केल्याचे भासवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वारूळ येथील माहेर असलेल्या योगिता चौधरी हीचा विवाह अमळनेर येथील देविदास उर्फ सूर्यकांत चौधरी याच्याशी झाला होता. देविदास उर्फ सूर्यकांत याला दारूचे व्यसन असून तो मजुरी करतो मुलबाळ नसल्याने तो पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला मारहाण करीत होता. तिला वारंवार माहेरून पैसे आण म्हणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत होता. दोन तीन दिवसांपूर्वी योगिता चलथान सुरत येथे मामाच्या घरी गेली असताना पतीने नातेवाईकांकडे तिची बदनामी सुरू केली होती म्हणून योगिता गैरसमज दूर करण्याकरिता पुन्हा पतीकडे परत आली होती. ८ रोजी योगीताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. तसेच ती खाली पडून आली असेही पतीने सांगून पोलिसात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर दिली होती. बचत गट वाले कर्जाचे पैसे मागणीसाठी तगादा लावत होते अशी  अफवा शहरात पसरविण्यात आली होती. मात्र तिचा भाऊ दिनेश आत्माराम चौधरी व इतरांनी प्रत्यक्ष पाहिले असता योगीताच्या गळ्यावर सर्व बाजूने दोरी आवळल्याचे व्रण होते. गळ्यावर ओरखडल्याच्या खुणा होत्या. तर तिच्या नाकातून देखील रक्त येत होते. वर छताला कुठेच दोरी लटकलेली अथवा तुटलेली दिसली नाही योगीताचे प्रेत खाली पडले होते.  बचाव करताना नखे लागली असावीत याची खात्री करण्यासाठी नखे तपासली असता ती वाढलेली नव्हती व चालूच कापलेली आढळून आली. तसेच योगिता वरून खाली पडून आली असे सांगितले जात होते मात्र वरून पडल्याने लागलेल्या काहीच जखमा अथवा चिन्हे दिसली नाहीत.  त्यामुळे योगीताचा खून झाल्याची खात्री दिनेशला झाल्याने त्याने रात्री उशिरा अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने ९ रोजी पहाटे पती सूर्यकांत विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.