अमळनेर, जि.जळगाव : एन.टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलमध्ये ‘सिंफनी २०२०’ स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्याचा आविष्कार करत देशभक्ती, महिला अत्याचारावर तसेच वंचित घटकांच्या समस्येवर प्रकाशझोत टाकला.दोन दिवस चाललेल्या समारंभात तृतीय पंथीयांच्या समस्या, जीवनातील विविध रस आणि स्त्रीवरील अत्याचार, पोलिसांच्या जीवनावरील कार्यक्रमानी प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या.प्रमुख अतिथी म्हणून आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, माजी चेअरमन नीरज अग्रवाल, डॉ.संदेश गुजराथी, जितेंद्र जैन, योगेश मुंदडा अध्यक्ष प्रकाश मुंदडा, अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडा, प्रा.ए.एम.जैन उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक नारायणदास मुंदडा, गोविंद मुंदडा, छाया मुंदडा, दीपिका मुंदडा, अमेय मुंदडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत कामगिरी करणाऱ्या, चित्रकला स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन राकेश शर्मा व अनुराधा वैद्य यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य लजपती लक्ष्मण, प्राचार्या विद्या लक्ष्मण, अरुण चौधरी, मोनिका दावरानी, सुनीता धनराळे यांनी परिश्रम घेतले.
अमळनेरला एन.टी.मुंदडा ग्लोबल स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 15:29 IST
एन.टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलमध्ये ‘सिंफनी २०२०’ स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्याचा आविष्कार करत देशभक्ती, महिला अत्याचारावर तसेच वंचित घटकांच्या समस्येवर प्रकाशझोत टाकला.
अमळनेरला एन.टी.मुंदडा ग्लोबल स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी सादर केला नृत्याचा आविष्कारतृतीय पंथीयांच्या समस्या, स्त्रीवरील अत्याचार, पोलिसांच्या जीवनावरील कार्यक्रमानी प्रेक्षकांच्या मिळवल्या टाळ्या मिळवल्या