शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

डॉक्टरला मारहाणप्रकरणी अमळनेरात निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 21:19 IST

गर्भवती महिला मृत्यू प्रकरण : दिवसभर वैद्यकीय सेवा बंद

अमळनेर : शहरातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ.निखिल बहुगुणे यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन दिले. दिवसभर सर्व वैद्यकीय सेवा बंद करण्यात केल्या होत्या.यामध्ये आयएमए, होमियोपॅथी असोसिएशन, निमा संघटना व क्लीनिकल लॅबोरेटरी अ‍ॅनालिस्ट अँड प्रॅक्टिशनर असोसिएशन तसेच केमिस्ट संघटनेसह शहरातील २०० डॉक्टर सहभागी होते.याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील वडती येथील सासर असलेल्या व अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील माहेर असलेल्या जयश्री कोळी या गर्भवती होत्या. पांढ?्या पेशी वाढल्यामुळे त्यांना डॉ.निखिल बहुगुणे यांच्या दवाखान्यात दाखल केले होते.१७ रोजी रात्री महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्याचा सल्ला डॉ.बहुगुणे यांनी दिला. त्यानंतर महिलेला रुग्णवाहिकेने धुळे येथे रवाना करण्यात आले. दरम्यान, थोडे अंतर गेल्यावर सदर महिलेचा श्वासोच्छ्वास बंद झाला म्हणून नातेवाईकांनी दुस?्या डॉक्टरला दाखवून पाहू, अशी चर्चा केली. याबाबत डॉ.बहुगुणे यांना कळवल्यानंतर त्यांनी परत आणा, आपण पुन्हा उपचार करू म्हणून रुग्ण महिलेसह नातेवाईकांना परत बोलावले. महिलेला पुन्हा तपासल्यांनतर ती मृत झाल्याचे सांगितले. त्यावेळी महिलेच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला. महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला आणि मृत असतानाही डॉक्टरांनी धुळे येथे हलवण्यास सांगितले, असा गैरसमज करून त्यांनी बहुगुणे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांना वाचवण्यासाठी त्यांचे कुटुंब आले असता त्यांनाही महिलेच्या नातेवाईकांनी मारहाण केली. १८ रोजी पहाटे ६ वाजेपर्यंत हा वाद सुरू होता. दवाखान्याबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डॉ.बहुगुणे यांच्या मानेला मार लागल्याने त्यांना धुळे येथे रवाना केले.या घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय व्यवसायाशी निगडित सर्व संस्थांनी भागवत रोड, बसस्थानक, जि.प.विश्रामगृह मार्गे तहसील कचेरीवर मोर्चा काढून तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन दिले. निवेदनावर आयएमए संघटनेचे अध्यक्ष डॉ.नितीन पाटील, सचिव डॉ.संदीप जोशी, होमियोपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत महाजन, सचिव निलेश पाटील, खजिनदार डॉ.राजेश वाडीले, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.रवींद्र जैन, सचिव डॉ.रईस बागवान, खजिनदार डॉ.सचिन पाटील, क्लीनिक लॅबोरेटरी संघटनेचे उदय खैरनार, भटू पाटील, सचिव सुनील पाटील, खजिनदार संजय मुसळे यांच्या सह्या आहेत. मोर्चात डॉ.बी.एस.पाटील , डॉ.राहुल मुठे, डॉ.शरद बाविस्कर, डॉ.सुमित सूर्यवंशी, डॉ.मिलिंद नवसारीकर, डॉ.जितेंद्र पाटील आदी सहभागी होते.दरम्यान, आयएमएचे अध्यक्ष डॉ. नितीन पाटील यांनी ३ दिवसांचा संप मागे घेत असल्याचे पत्रकार पिषदेत सांगितले.