शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 16:21 IST

वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळावा झाला.

भुसावळ : येथील पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळावा रविवारी झाला. अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक होते. आमदार संजय सावकारे यांनी उदघाटन केले.ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी विष्णू चौधरी, आरपीएफ इन्स्पेक्टर संजय गायकवाड तसेच ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्याम दरगड, नीळकंठ भारंबे, प्राचार्या डॉ. मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बऱ्हाटे, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा.शैलेश पाटील प्रमुख अतिथी होते.हा मेळावा ऑनलाईनही घेण्यात आला. या मेळाव्यात विविध ११५ शहरातील माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात बऱ्याचशा माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला जी मदत आवश्यक असेल ती आम्ही देऊ, असे आश्वासन दिले.यावेळी आमदार सावकारे यांनी यावेळी सांगितले की, माजी विद्यार्थ्यांनी सढळ हातांनी आजी विद्यार्थ्यांना मदत करावी व आजी विद्यार्थ्यांकरिता भविष्यात आपण नवनवीन संकल्पना राबवू व आजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले.यावेळी डॉ. मोहन फालक, उपप्राचार्य डॉ.बी.एच. बऱ्हाटे, अजय भोळे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील यांची मनोगते झाली.प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ.जी.आर. वाणी यांनी केले तर ऋणनिर्देशन प्रा.हर्षल पाटील यांनी केले, सूत्रसंचालन मेघा चौधरी, ममता कोल्हे यांनी केले.मेळावा यशस्वीतेसाठी आशिष चौधरी, प्रा.चंद्रकांत सरोदे, डॉ.गौरी पाटील, प्रा.दीपक पाटील, अजय भोळे, संतोष विनंते, प्रा.स्वाती शेळके, डॉ.सचिन येवले, डॉ.स्वाती फालक, डॉ.उमेश फेगडे, प्रा.संगीता भिरूड, डॉ. सचिन कोलते, डॉ.अजय क्षीरसागर, प्रा.महेश सरोदे, प्रा.शंकर पाटील, प्रा.जितेंद्र आडोकार, प्रा.दीपाली नेमाडे, प्रा.काजल वारके, प्रा. कल्याणी पाटील यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Educationशिक्षणBhusawalभुसावळ