शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

प्रचारादरम्यान आकर्षण ठरलेल्या प्रेमवेड्या आजूचा असाही सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:11 IST

आजू उर्फ अजय वाघ हा अशिक्षित तसेच थोडा भोळसर असलेला हा तरुण आमदार किशोर पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. विना मोबाइल कानावर हात ठेवत पाटील यांच्याशी साऱ्याच गप्पा तो मारतो. प्रचारा दरम्यान आजू एक आकर्षण होता.

प्रमोद ललवाणीकजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : प्रेम आंधळं असतं, असं म्हटलं जातं. तेदेखील तेवढंच खरं आहे. कारण आजू उर्फ अजय वाघ हा अशिक्षित तसेच थोडा भोळसर असलेला हा तरुण आमदार किशोर पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. विना मोबाइल कानावर हात ठेवत पाटील यांच्याशी साऱ्याच गप्पा तो मारतो. प्रचारा दरम्यान आजू एक आकर्षण होता. असा हा प्रेम वेडा किशोर पाटील यांच्या सत्काराला चक्क भडगावात पोहचला. मात्र पाटील यांनीच त्याला पेढा भरवत हृदयास लावले. या वेळी सारेच या प्रेमाप्रति भावनाप्रधान झाले नि आजूच्या प्रेमास सीमाच राहिली नाही आणि कजगावसह परिसरातील चाळीस खेड्यात आजूच्या प्रेमाची चर्चा चांगलीच रंगतेय.कजगाव येथील सतरा-अठरा वर्षे वयोगटातील एक युवक थोडा भोळसर आहे. मात्र प्रत्येकाला योग्यतेनुसार नमस्कार, जयभीम, जयहरी, जय जिनेंद्र, जयबाबाजी करत प्रत्येकाशी बोलणारा हा आजू वाघ जैन धर्मावर विशेष प्रेम करतो. जैन धर्माच्या गुरूंना घेण्यास जाणे, चातुर्मास दरम्यान प्रवचनास उपस्थिती तसेच इतरही धर्माबाबत विशेष आदर ठेवणारा हा आजू प्रत्येक लग्न समारंभास उपस्थित असतो. याबरोबरच कोणती जयंती असो वा कोणती मिरवणूक असो येथे आजूची उपस्थिती हमखास असतेच. याबरोबरच प्रत्येक अंत्यविधीस उपस्थिती ही हमखास असतेच. असा हा आजू गेल्या अनेक दिवसांपासून आमदार किशोर पाटील यांचा सच्चा कार्यकर्ता बनला आहे.हातालाच मोबाइल समजणारा आजूदिवसभरात हात कानावर ठेवत तो अनेकदा आमदार किशोर पाटील यांच्याशी बोलतो. मात्र हा सारा प्रकार पाहून नवीन लोक हे काय आहे करत पुढे जातात मात्र आजूचे विना मोबाइल संभाषण सुरूच रहाते. दरम्यान विधानसभा निवडणुकीत किशोर पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने आजू कार्यकर्त्याबरोबर प्रचारात व्यस्त झाला नि आजू एक आकर्षण बनला. किशोर पाटील निवडून आल्यानंतर आजूच्या आनंदाला सीमाच राहिल्या नाहीत आणि मग कार्यकर्त्यांनी आजूला किशोर पाटील यांच्या भेटीस नेले. मात्र तेथे आमदार पाटील यांनीच आजू यास पेढा भरवत हृदयास लावत त्याचा सत्कार केला. याप्रसंगी सारेच उपस्थित भावनाविवश झाले अशा या सत्काराची चर्चा मात्र कजगावसह परिसरातील ४० खेड्यात चर्चिली जात आहे. 

टॅग्स :SocialसामाजिकBhadgaon भडगाव