शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

निवेदन देण्यासाठी ‘हम पॉंच’ला मुभा! शासकीय कार्यालयात घोषणाबाजीला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2023 15:36 IST

आंदोलनकर्त्यांना शासकीय कार्यालयात घोषणाबाजी करायलाही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विविध कार्यालय प्रमुखांना निवेदन देण्यासाठी होणाऱ्या गर्दीला आता लगाम बसणार आहे.

- कुंदन पाटील

जळगाव : जिल्ह्यातील आंदोलनकर्त्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्यानुसार निवेदन देण्यासाठी आता पाच जणांनाच परवानगी असणार आहे. तसेच आंदोलनकर्त्यांना शासकीय कार्यालयात घोषणाबाजी करायलाही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विविध कार्यालय प्रमुखांना निवेदन देण्यासाठी होणाऱ्या गर्दीला आता लगाम बसणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयात अनेक जण, राजकीय संघटना, अराजकीय संघटना, मोर्चा काढून निवेदन देण्यासाठी येतात. कार्यालयासह परिसरात घोषणाबाजी करुन कार्यालयातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल यांनी एक परिपत्रक काढले असून याद्वारे निवेदन देण्याबाबत मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार संबंधित सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांना सूचना करण्यात आल्या आहेत.

अशी आहे संहिता१) निवेदन देण्यापूर्वी एक दिवस आधी संबंधित पोलीस स्टेशन आणि संबंधित कार्यालयाच्या प्रमुखाला एक दिवस आधी कळवावे लागणार आहे.२) निवेदन देतांना मोर्च्यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षात घेऊन पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्याची जबाबदारी संबंधित पोलीस निरीक्षकाची असणार आहे.३) मोर्चामधील केवळ ५ व्यक्तींना निवेदन देण्याची मुभा राहील. मोर्चा काढून निवेदन देतांना शासकीय कार्यालयात शांतता ठेवणे आवश्यक राहील. ४) कार्यालयातील कर्मचाऱ्यांना, कार्यालयात उपस्थित नागरिकांना घोषणाबाजीमुळे त्रास होणार नाही, याबाबत संबंधितांना पूर्व यासंदर्भात सूचना द्यावी. तरीही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संघटनांवर संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सूचित केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव