एरंडोल : तालुक्यात बोंडअळीमुळे कापसाचे नुकसान झालेल्या १७ हजार ६८१ शेतकºयांना तालुका प्रशासनातर्फे १२ कोटी ९० लाख रुपयांच्या अनुदानाचे वाटप केल्याची माहिती सूत्रांनी दिली.एरंडोल तालुक्यात बोंडअळी बाधीत शेतकºयांची संख्या २९ हजार ९४२ असून त्यापैकी १७ हजार ६८१ लाभार्र्थींना एकूण १२ कोटी ९० लाख तीन हजार अनुदान वितरीत करण्यात आले आहे. रब्बी पेरण्यांच्या पार्श्वभूमीवर प्राप्त झालेले अर्थसहाय्य शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा झाल्यामुळे शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.एकूण १८ कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव आयुक्ताकडे पाठविण्यात आला आहे. तिसºया व अंतिम टप्प्यात ११ हजार ९०० लाभार्थींना पाच कोटी ९१ लाख रुपये अनुदान प्राप्त झाल्यावर वितरीत करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.एरंडोल तालुक्यात एकूण बोंडअळी बाधीत शेतकरी २९ हजार ९४२ असून त्यात जिराईत २१ हजार ६४२ व बागाईत १० हजार ९४४ याप्रमाणे संख्या आहे.
एरंडोल तालुक्यात बोंडअळीचे १३ कोटींचे अनुदान वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 23:18 IST
एरंडोल तालुक्यात बोंडअळीमुळे कापसाचे नुकसान झालेल्या १७ हजार ६८१ शेतकºयांना तालुका प्रशासनातर्फे १२ कोटी ९० लाख रुपयांच्या अनुदानाचे वाटप झाले.
एरंडोल तालुक्यात बोंडअळीचे १३ कोटींचे अनुदान वाटप
ठळक मुद्देतालुक्यातील १७ हजार ६८१ शेतकऱ्यांना लाभ२९ हजार ९४२ शेतकरी बाधित१८ कोटींच्या अनुदानाचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर