शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

प्रधानमंत्री आवास योजनेबाबत बँकांची उदासीनता असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 22:39 IST

हुडकोच्या अधिकाºयांनी व्यक्त केली खंत : योजनेचे सर्वेक्षण ३१ आॅक्टोबरपूर्वी पूर्ण करा

ठळक मुद्दे जिल्ह्यात ५१ हजार २७७ घरे बांधण्याचे उद्दिष्टप्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न बँकांनी या योजनेकडे संधी म्हणून बघावे.

आॅनलाईन लोकमत,जळगाव, दि.१३-प्रधानमंत्री आवास योजना ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रथमच या प्रकल्पामध्ये सहकारी बँकांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र बँकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे,अशी खंत हुडकोच्या उप महाव्यवस्थापक वैजयंती महाबळे यांनी व्यक्त केली.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या ‘सर्वांसाठी घरे-२०२२’ या योजनेच्या जिल्हा पातळीवरील उद्दष्टिपूर्तीसाठी नियोजन भवनात शुक्रवार दि.१३ रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन खासदार ए. टी. पाटील यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर  आमदार सुरेश भोळे, म्हाडाचे अधीक्षक अभियंता दिलीप मुगळीकर आदी उपस्थित होते.या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यांना घरांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेले सर्व्हेक्षणाचे काम सर्व नगरपालिकांनी येत्या ३१ आॅक्टोबर पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले.वैजयंती महाबळे म्हणाल्या की,   बँकांनी या योजनेकडे संधी म्हणून बघावे.  जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. देशातील ४ हजार ४१ तर राज्यातील ३७२ शहरांमध्ये ही योजना राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात ५१ हजार २७७ घरे बांधण्याचे उद्दिष्टप्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील जळगाव शहर महानगरपालिका- १८ हजार ६१, भुसावळ नगरपरिषद-७ हजार ३०४, अमळनेर - ३ हजार २१७, चाळीसगाव- ३ हजार ८६७, चोपडा- २ हजार ९७८, पाचोरा- २ हजार ६९१, जामनेर- २ हजार ११६, एरंडोल- १ हजार ४१९, धरणगाव- ८४७, पारोळा- १ हजार ६८०, रावेर- १ हजार १९३, यावल- १ हजार ६७०, सावदा, वरणगाव, भडगाव, फैजपूर प्रत्येकी ८४७ तर बोदवड नगरपंचायतीस ८४६ असे एकूण  ५१ हजार २७७ घरे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे कानडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.