शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:11 IST

शिरखुर्म्याच्या घटक पदार्थांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी

जळगाव : मुस्लीम बांधवांचा सर्वात मोठा रमजान ईद सण अवघ्या आठ दिवसांवर आला असून या सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग सुरू आहे. विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शहरातील विविध मार्केटमध्ये गर्दी होत असून समाजबांधवांमध्ये उत्साह दिसून येत आहे.रमजान महिन्याचा शेवटचा आठवडा शिल्लक असल्याने बाजारात ईदच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. विविध वस्तू खरेदीसाठी अनेकजण बाहेर पडल्याने बाजारपेठ फुलली आहे. शहराच्या अतिशय मध्यवर्ती आणि सर्व प्रकारच्या चीजवस्तू हमखास मिळणाऱ्या महात्मा फुले मार्केट आणि परिसरात महिला, लहान मुले-मुलींची झुंबड उडत आहे. सर्व प्रकारची पादत्राणे, कपडे, बेण्टेक्स ज्वेलरी, अत्तर, सुरमा, घरगुती सर्व वस्तू येथे मिळत असल्याने एकाच वेळी मनासारखी आणि हव्या त्या किमतीची वस्तू घेण्यासाठीही लगबग वाढली आहे.बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन खरेदी केली असली तरी अनेकजण हाताला आवर घालताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई यामुळे हे प्रमाण कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. एरव्ही प्रत्येक मुस्लीम बांधव रमजान महिन्यात व ईदसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करतातच. त्यामुळे महागाई वाढत असली तरी रमजान सणासाठी खरेदीचा उत्साह कायम आहे.रेडिमेड कपड्यांकडे कलयुवा पिढीचा कल तयार कपड्यांकडे आहे. शहरात अनेक नामवंत कंपन्यांची दालने (शोरुम) आहेत. ऐपतदार वर्ग त्याकडे वळत आहे. अर्थात ते खिशाला नाही परवडले तर पारंपरिक, व्यवसाय-उद्योगाला योग्य कपडे आपल्या टेलरकडून वाजवी दरात शिवणाऱ्यांची संख्याही कमी नाही.बांगड्यांना मागणीहिंदू बांधवांचा असो की मुस्लीम बांधवांचा सण, यासाठी महिलांचा खरेदीकडे मोठा कल असतो. त्यानुसार ईद सणासाठीही मुस्लीम महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून त्यांच्याकडून विविध प्रकारच्या बांगड्या, गळ््यातील हार, विविध साज यांची खरेदी करीत आहेत. यामध्ये दोºयात खडे विणलेल्या बांगड्यांना अधिक पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या सोबतच आकर्षक हैद्राबादी सेट, जयपुरी सेट,विविध प्रकारातील काचेच्या बांगड्या बाजारपेठेत उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.शिरखुर्म्याचीही तयारीसामाजिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव शिरखुर्मा तयार करून समाज बांधवांसह हिंदू बांधवांनाही आपुलकीने आमंत्रित करतात. या शिरखुर्म्याच्या घटक पदार्थांचीही खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सुक्यामेव्यासह शेवयांचीही मागणी वाढली आहे.रमजान ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेत उत्साह आहे. महिलांकडून विविध प्रकारच्या बांगड्या व इतर वस्तूही खरेदी केल्या जात आहे.-ताहेर शेख, विक्रेते.रमजान ईदसाठी कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे. अनेक जण तयार कपड्यांना (रेडीमेड) पसंती देत आहे तर कोणी टेलरकडून कपडे शिवून घेत आहे.-सुमीत हेमनाणी, विक्रेते.

टॅग्स :Jalgaonजळगाव