शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘श्री गजानन विजय’ पोथीचे सर्व २१ अध्याय एकाच दिवसात मुखोद्गत सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:46 IST

पारायणात भाविक तल्लीन

जळगाव : सर्व धार्मिक ग्रंथांचा सार सामावलेल्या ‘श्री गजानन विजय’ या दास गणू महाराज रचित पोथीतील सर्व २१ अध्याय एकाच दिवसात सादर आणि तेही मुखोदगत, असा योग भाविकांनी अनुभवला तो मार्गशीर्ष पौर्णिमा व गुरुवार अशा शुभयोगावर शहरातील हरेश्वरनगरात. निमित्त होते मधुवंती देशमुख आणि दिवाकर देव या भावंडांनी आयोजित केलेल्या संत गजानन महाराज यांच्या ‘श्री गजानन विजय’ पोथी पारायणाचे. या वेळी ‘शेगावीच्या महंता, तुज काय मागू आता.....’ अशा श्री गजानन महाराज यांच्या एकाहून एक सादर करण्यात आलेल्या साक्षात्काराच्या ओवीमध्ये भाविक तल्लीन होऊन गेले होते.श्री दत्त जयंती महोत्सव व त्यात गुरुवारीच आलेली मार्गशीर्ष पौर्णिमा या योगावर हरेश्वर नगरमध्ये श्री गजानन विजय पोथीचे पारायण आयोजित करण्यात आले होते. एकाच भक्ती परंपरेतील गजानन महाराज, रामदास स्वामी, नृहसिंह सरस्वती यांचे साक्षात्कार, चमत्कार तसेच त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा उल्लेख असलेल्या श्री गजानन विजय या पोथीतून भक्ती मार्गाची जागृती होते व पारायण तसेच वाचनाने घरातील समस्या मार्गी लागतात, अशी भाविकांची श्रध्दा आहे. अशा या पारायणसाठी हरेश्वर नगरातील दिवाकर देव यांच्या निवासस्थानी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.२१ अध्याय मुखोदगतश्री गजानन विजय या पोथीचे २१ अध्याय आहेत. त्याचे कोठे पारायण होत असताना पोथीचे वाचन करीत पारायण होते. मात्र जळगावात आयोजित या पारायणमध्ये ठाणे येथील विद्या पडवळ यांनी मुखोदगत पारायण केले. सर्व २१ अध्यायातील शब्द न शब्द त्यांचे तोंडपाठ आहेत, हे विशेष.नऊ तासात सर्व अध्याय पूर्णया पोथीचे पारायण करताना सात दिवसाचे आयोजन असते व दररोज दोन किंवा तीन अध्याय होतात. मात्र विद्या पडवळ यांनी एकाच दिवसात सर्व २१ अध्याय सादर केले. गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता पारायणाला सुरुवात होऊन संध्याकाळी साडे पाच वाजता समाप्ती झाली. सलग नऊ तास पडवळ यांनी पारायण करीत २१ अध्याय पूर्ण केले.पारायण दरम्यान पडवळ यांनी संत गजानन महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंग हुबेहुब सादर केले. या पारायणात भाविक शेवटपर्यंत खिळून राहिले. पारायणानंतर सर्व भाविकांना श्री गजानन विजय पोथी भेट देण्यात आली व भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.

टॅग्स :Jalgaonजळगाव