शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

अक्षयतृतीया, सासूरवाशीणींचा सण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 12:13 IST

खान्देशात घागर भरणी

ठळक मुद्देसालदार करारबद्धकृषी अवजारे मालकातर्फे नव्या सालदाराकडे सुपूर्द

प्रसाद धर्माधिकारी / आॅनलाइन लोकमतनशिराबाद, जळगाव, दि. १८ - : अक्षयतृतीयेला खान्देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सासूरवाशीणींचा हा सण आहे. बुधवारी घरोघरी अक्षयघट म्हणजे पाण्याची घागर भरली जाईल. त्याच्यावर छोटे मातीचे भांडे ठेऊन त्यावर खरबूज आणि दोन सांजोऱ्या, दोन आंबे ठेवतात. छोटे भांडे पितरांसाठी. आधी त्यांना पाण्याचा घट देऊन मग नवीन माठ वापरण्यात येतो. पितरांचे तर्पणविधी होतो.सकाळी पूर्वजांचं स्मरण करुन कुंकवाचं एकेक बोट उंबरठ्यावर उमटवत आणि एकेक नाव उच्चारत पितरांना आमंत्रण दिले जाते. दुपारी चुलीवर आता गॅसवरच ‘घास’ टाकतात. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा बेत असतो. आजपासून आंबे खायला सुरुवात करतात.खान्देशात आखाजीचे अजून एक महत्व आहे. भले तो लौकीक अर्थाने पितरांचा सण का म्हणेनात. पण खान्देशात हा सासूरवाशिणींचाही सण आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातून दोनदाच माहेरी जायला मिळते. दिवाळी आणि आखाजी. दिवाळी घाई गडबडीत करण्यात जाते. आखाजी म्हणजे विसाव्याचा सण. सासरच्या घबडग्यातून, कामाच्या रट्ट्यातून तेवढाच आराम. त्यामुळे त्या या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. सासूरवाशिणींना गौराई असं म्हटलं जातं. आणि जावयाला शंकरजी!खान्देशातील आखाजी हा सण सवार्साठी संपूर्ण बंधनमुक्तीचा दिवस असतो. या दिवशी स्त्री, पुरुष, शेतकरी, शेतमजूर, आबालवृद्ध या सर्वांना पूर्ण स्वातंत्र्य लाभते. प्रत्येक जण बंधनमुक्त असतो. काम करणाºया मजुरांना या दिवशी सुटी असते. शेतकरी सर्व शेतीची कामे या दिवशी बंद ठेवतात. प्रत्येक विवाहित स्त्री या दिवशी सणानिमित्ताने माहेरी आलेली असल्याने ती झोके खेळायला, गाणी गायल पूर्ण मुक्त असते.सालदार करारबद्धअक्षयतृतीयेच्या दिवशी शेतकरी शेतीची कामे बंद ठेवतो. शेतमजुरांना या दिवशी सुटी असते. वर्षांच्या कराराने काम करणाºया सालदाराचा हिशेब या दिवशी पूर्ण करून त्यास शेतकरी बंधनमुक्त करतो. सालदाराचा हा दिवस जुन्या मालकाकडील वर्षांचा शेवटचा दिवस असतो. याच दिवशी वाढीव रकमेवर शेतमजूर त्याच शेतकºयाकडे किंवा दुसºया श्ोतकºयाकडे सालदार म्हणून करारबद्ध होत असतो. शेतकरी व शेतमजूर प्रेमळ, विश्वासू अशा व्यक्तीची निवड करून प्रसंगी जास्तीची रक्कम देऊन करारबद्ध होतात. याच काळात मुलामुलीच्या लग्नासाठी शेतमजूर शेतकºयांकडून आपल्या मजुरीची आगाऊ रक्कमही घेत असतो. या सालदाराची एका वर्षांची मजुरी गावागावांनुसार व शेतकºयाच्या कामाच्या व्यापानुसार भिन्न असते. या दिवशी जुन्या सालदाराला मालकातर्फे जेवण दिले जाते. जुना सालदार आपल्या ताब्यातील कृषी अवजारे मालकातर्फे नव्या सालदाराकडे सुपूर्द करतो. अशा प्रकारे शेतमजुरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आखाजी हा सण.

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीयाJalgaonजळगाव