शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथराव खडसे यांच्या कुजबुजीने भाजपात खळबळ माजेल, अजित पवार यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 22:29 IST

एकनाथराव खडसे हे माझ्या कानात काय बोलले हे मी सांगणार नाही, पण त्यामुळे भाजपा नेत्यांची नक्कीच झोप उडेल, राज्यात खळबळ माजेल, असा दावा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  येथे केला.  

ठळक मुद्देजायचे असते तरी कधीच पक्षाला लाथ मारली असती - एकनाथराव खडसेअडचणीत आणायचे असेल तर चौकशी

जळगाव:  एकनाथराव खडसे हे माझ्या कानात काय बोलले हे मी सांगणार नाही, पण त्यामुळे भाजपा नेत्यांची नक्कीच झोप उडेल, राज्यात खळबळ माजेल, असा दावा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  येथे केला.  त्यानंतर मात्र पवार यांनी हे मी विनोदाने बोलत असल्याचे म्हणत कानात खडसे काय कुजबुजले याचा खुलासा केला नाही. तर मनोगतात  खडेस यांनी  गेल्या 40 वर्षात मला अनेक प्रलोभने मिळाली पण पक्ष सोडला नाही. पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. जायचे असते तरी कधीच पक्षाला लाथ मारली असती, असेही ते म्हणाले.   राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय गौरव सोहळा येथील नूतन मराठा महाविद्यालयात गुरुवार, 28 रोजी सायंकाळी पार पडला.   यावेळी व्यासपीठावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि  भाजपाचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे हे एकत्र आल्याने या समारंभाकडे सा-यांचे लक्ष लागले  होते. हाच धागा पकडत अजित पवार म्हणाले की,  खडसे यांनी 30 ते 40 वर्षे त्यांच्या पक्षासाठी मेहनतीची तपश्चर्या केली. असे असताना ज्यांच्यासाठी आपण लढलो तेथेच  समस्या निर्माण होते अशी स्थितीही आली. एकीकडे सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची तातडीने चौकशी मार्गी लावली जाते आणि लगेच त्याच पदावर त्यांना संधी दिली जाते. आणि खडसेंच्या बाबतीत मात्र तारीख पे तारीख..अडचणीत आणायचे असेल तर चौकशी..कामाला काय फळ मिळाले, असाही त्यांनी खडसे यांच्या संदर्भात उल्लेख केला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Khadaseएकनाथ खडसे