शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

कर्णबधिर दिव्यांगांना हवाय वाहन चालक परवाना ? मग जळगावला चला, सुरू झालीय तपासणी सुविधा

By अमित महाबळ | Updated: September 17, 2022 21:07 IST

जळगाव : वाहन चालक परवाना मिळण्यासाठी कर्णबधीर दिव्यांगांना लागणारी वैद्यकीय तपासणीची सुविधा जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) ...

जळगाव : वाहन चालक परवाना मिळण्यासाठी कर्णबधीर दिव्यांगांना लागणारी वैद्यकीय तपासणीची सुविधा जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) सुरू झाली आहे. या तपासणीत दिव्यांग व्यक्ती पात्र ठरल्यानंतर त्याला परिवहन विभागाशी (आरटीओ) संबंधित पुढील प्रक्रिया पार पाडता येणार आहे.

४० टक्क्यांच्या वर कर्णबधीरतेचा दोष असल्यास अशा व्यक्तींना आतापर्यंत वाहन चालक परवाना मिळत नव्हता. मात्र, आता शासन निर्णयानुसार कानाचे मशीन (हिअरिंग एड) लावून केलेल्या तपासणीत अपेक्षित निकषांवर दिव्यांग व्यक्ती पात्र ठरत असल्यास त्याला वाहन चालक परवाना मिळू शकणार आहे. ही तपासणी जीएमसीमध्ये शक्य झाली आहे. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान (एडेड ऑडिओग्राम व बेरा) नुकतेच उपलब्ध झाले आहे. या संदर्भात बरेच दिवस पाठपुरावा सुरू होता. बेरा मशीन बहिरेपणा किती आहे याची टक्केवारी काढते. त्यासाठी एक ते दीड तास वेळ लागतो. जीएमसीच्या बाह्य रुग्ण विभागातील खोली क्रमांक २०२, पहिला मजला या ठिकाणी सोमवार ते शनिवार, सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ही तपासणी केली जाणार आहे. मात्र, त्यासाठी कान, नाक व घसा विभागात पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.

राज्यात चार ठिकाणी सुविधा, खान्देशात फक्त जळगावमहाराष्ट्रात २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असून, आतापर्यंत केवळ मुंबई, पुणे व नागपूर या तीन ठिकाणी बेरा श्रवण तपासणी केली जात होती. या निवडक ठिकाणांमध्ये आता जळगाव जीएमसीचादेखील समावेश झाला आहे. रजत महोत्सवी वर्ष पूर्ण झालेल्या शासकीय महाविद्यालयांमध्येही अशी सुविधा नाही. खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तीनही जिल्ह्यांपैकी केवळ जळगावमध्ये या प्रकारची तपासणी शक्य झाली आहे.

कर्णबधीर दिव्यांगांची गैरसोय दूरदिव्यांग प्रमाणपत्र व वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी ऑडिओमेट्री व बेरा या श्रवण तपासणी सुविधा रुग्णालयात सुरू झाल्या आहेत. यामुळे कर्णबधीर दिव्यांगांची गैरसोय दूर झाली आहे, अशी माहिती जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

पूर्वनोंदणी आवश्यकवाहन परवाना मिळविण्यासाठी कर्णबधीर दिव्यांगांना लागणारी वैद्यकीय तपासणी सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्याचा दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा. यासाठी पूर्वनोंदणी करणे गरजेचे आहे, अशी माहिती जीएमसीचे कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरोदे यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव