शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ रेल्वे स्थानकावर वातानुकूलित वेटिंग हॉलचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 15:40 IST

रेल्वे स्थानकावर खासगी वातानुकूलित वेटिंग हॉलचे उद्घाटन करण्यात आले.

ठळक मुद्देरेल्वेची खासगीकरणाच्या दिशेने सुरू झाली वाटचालविभागातील प्रथम खासगी हॉलप्रतीक्षालयात सोयीसुविधाप्रतीक्षालयात बॉडी मसाज सोबतच बूट पॉलिशही होणार

भुसावळ : रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ४ वर मंडळातील प्रथम खासगी वातानुकूलित वेटिंग हॉल (प्रतीक्षालय) चे उद्घाटन व्हिडिओ लिंकद्वारे लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ११ रोजी सकाळी ११:१५ वाजता करण्यात आले.वातानुकूलित वेटिंग हॉलच्या व्हिडिओ लिंकद्वारे झालेल्या कार्यक्रमात खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्यासह उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते. स्थानकावर स्टेशन निर्देशक जी.आर. अय्यर यांनी प्रतीक्षालयाचे फीत कापून उद्घाटन केले.भुसावळ जगातील पहिले खासगी प्रतीक्षालयरेल्वे खासगीकरणाला आधीच सुरुवात झाली आहे. यासह स्थानकावरील प्रतीक्षालयाचेही खासगीकरणाला सुरुवात झाली आहे. भुसावळ मंडळातून पहिले खासगी प्रतीक्षालय भुसावळ फलाट क्रमांक ४ वर प्रवाशांच्या सेवेसाठी खुले झाले आहे.प्रतीक्षालयात सोयीसुविधाखासगी ठेकेदारामार्फत चालविण्यात येणाऱ्या प्रतीक्षालयात प्रति वयस्कर व्यक्तीस प्रति तास १५ रुपये, तर लहान मुलांसाठी आठ रुपये दर आकारले जाणार आहे. याशिवाय प्रतीक्षालयात चहा, कॉफी, मिनरल वॉटरची सुविधा करण्यात आली आहे. अर्थातच याचे शुल्क वेगळे द्यावे लागणार आहे. शिवाय बूट चकचकीत करण्यासाठी पाच रुपये, बॉडी मसाजसाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.दरम्यान, एकाच वेळेस सुमारे ६० ते ७० प्रवासी बसू शकतील, अशी व्यवस्था प्रतीक्षालयाालय करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी दोन टीव्ही संच लावण्यात आलेले आहेत. सोफासेट व खुर्च्यांची सुविधा बसण्यासाठी करण्यात आलेली आहे.ठेकेदाराकडून रेल्वे प्रशासन वार्षिक तीन लाख ७५ हजार आकारणार आहे.यावेळी स्टेशन निदेशक गोपी अय्यर, मंडळ वाणिज्य निरीक्षक सुदर्शन देशपांडे, स्टेशन प्रबंधक मनोज श्रीवास्तव, यात्री सुविधा समिती सदस्य डॉ.राजेंद्र फडके, परीक्षित बºहाटे, डॉ.माधव धांडे उपस्थित होते. मंडल वाणिज्य प्रबंधक बी. अरुणकुमार यांनी आभार मानले.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ