शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त नागरिकांचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या घरासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 12:32 IST

दिवाळीच्या दिवशीच घरांमध्ये शिरले पाणी

जामनेर, जि. जळगाव : ऐन दिवाळीच्या दिवशी जामनेर शहरात झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील विविध भागात व रहिवासी वसाहतीतील घरांमध्येय मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संतप्त नागरीकांनी सोमवारी सकाळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचे नागरीकांनी वाभाडे काढले.दरम्यान, पालकमंत्री महाजन यांनी पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना तातडीने व्यवस्था करण्याचे आदेश दिले व इंदिरा आवास, दामले प्लॉट भागात सुरक्षा भिंत व पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार बांधण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.शनिवारी रात्री व रविवारी शहरात झालेल्या मुसळधार पावसाने श्रीराम नगर, शिक्षक कॉलनी, दत्त चैतन्य नगर, वाकी रोड, जळगांव रोड परिसरात व पोलीस ठाणे परिसरात पाणी साचले. पुरा भागातील दामले प्लॉट व इंदिरा आवास नगरमधील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. पाणी घरात शिरल्याने जीवनावश्यक वस्तू वाहुन गेल्या. मोठे नुकसान होऊनदेखील या भागातील नगरसेवकांनी नागरिकांची साधी विचारपूसही न केल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली. निवडणुकीत मते मागायला येणाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या सणात ओढवलेल्या संकट समयी पाठ फिरवल्याने संतापाचा उद्रेक झाला.याच संतापातून सुमारे दोनशे महिला, पुरुषांनी सोमवारी सकाळी महाजन यांचे निवासस्थान गाठले. यावेळी काही नगरसेवक हजर होते. महाजन यांना भेटून कैफीयत मांडण्याचा हट्ट नागरिकांनी धरल्याने महाजन यांनी त्यांची भेट घेऊन समजूत घातली व तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले.दरम्यान, शहरात होत असलेल्या भुयारी गटारीच्या सदोश कामामुळे काही भागात गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने घरात घाण पाणी शिरत आहे. पालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव