शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वृद्धेची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 12:54 IST

निराधार योजनेचा लाभ मिळेना

ठळक मुद्दे जाब विचारण्यासाठी वृद्ेला ठेवले लिपिकाच्या टेबलावरकागदपत्रांची पूर्तता करा

जळगाव : घरात अन्नाचा एक कण नाही, साधा चहा पिण्यासाठी पैसे नाही, अशा बिकट परिस्थितीत असलेल्या भिकूबाई हेमलाल लोहार या ९५ वर्षीय वृद्धेचे निराधार योजनेचे अनुदान बंद झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून वृद्धेचे प्रचंड हाल होत आहे. हे अनुदान पुन्हा सुरू व्हावे म्हणून सबंधित कार्यालयात वारंवार चकरा मारूनही उपयोग होत नसून प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या वृद्धेवर उपासमारीची वेळ आली आहे.दरम्यान, अधिकारी, कर्मचारी हे या महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शिवसेनेच्या महिला महानगरप्रमुख मंगला बारी यांनी या वृद्धेला थेट कार्यालात नेऊन तिला लिपिकाच्या टेबलावर ठेवले व दिरंगाईबाबत जाब विचारला.शहरातील पांझरापोळ चौकानजीक असलेल्या बुनकरवाडीमध्ये भिकूबाई हेमलाल लोहार ही ९५ वर्षीय वृद्धा एकटीच राहते. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत या वृद्धेला अनुदान मिळत असे व त्यावर तिचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून वृद्धेचे अनुदान बंद झाल्याने तेव्हापासून ही वृद्धा हैराण झाली आहे. आज पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील, या आशेवर वृद्धा जगत असून पोटाची खळगी भरण्यासाठी तिला इतरांकडे विनवण्या कराव्या लागत असल्याचे चित्र आहे.पाठपुरावा करूनही अनुदान मिळत नसल्याने सदर वृद्धेने मंगला बारी यांच्याकडे धाव घेतली व आपबिती सांगितली. त्या वेळी मंगला बारी यांनी रेल्वे स्थानकनजीक असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात जाऊन वृद्धेबाबत माहिती दिली. चार महिन्यांपासून बारी या सदर कार्यालयाच्या चकरा मारत असून काहीही उपयोग झालेला नाही. अखेर कंटाळून त्यांनी सदर वृद्धेला सोबत घेऊन हे कार्यालय गाठले व वृद्धेला उचलून थेट कार्यालयातील लिपिकाच्या टेबलावर ठेवून वृद्धेचे हाल दाखविले.कागदपत्रांची पूर्तता करागेल्या अनेक दिवसांपासून चकरा मारत असताना केवळ उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या अधिकारी, कर्मचाºयांनी सदर वृद्धेच्या पासबुक तसेच आधार कार्डच्या झेरॉक्सची मागणी केली. एवढ्या दिवसांपासून चकरा मारत आहे, तेव्हा कागदपत्रे आठवले नाही आणि आता कागदपत्रे मागतात, तुमच्या या कारभारामुळे दोन वर्षापासून वृद्धेवर उपासमारीची वेळ आली, यास जबाबदार कोण, असा जाब मंगला बारी व भाजपाचे कार्यकर्ते किशोर वाघ यांनी कार्यालयात विचारला.दिवाळी गेली अन्नाविनाजवळ एक पैसा नसल्याने घरात दररोज अन्नपाण्यासाठी वृद्धेचे हाल आहे. त्यात दिवाळी सणही अन्नाविना गेला, इतका गंभीर प्रसंग या वृद्धेवर ओढावला आहे.चहासाठी पैसे नसलेल्या वृद्धेकडे तीन हजाराची मागणी !सदर वृद्धेचे अनुदान पुन्हा सुरू करण्यासाठी कार्यालयात काही जण तीन हजार रुपये मागत होते, असे सदर वृद्धेचे म्हणणे आहे. ज्या महिलेजवळ चहा घेण्यासाठी पैसे नाही, ती वृद्धा तीन हजार रुपये कोठून आणेल, असा सवाल बारी व वाघ यांनी केला आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.अनुदान प्रक्रिया आॅनलाईन झाल्यानंतर अनेकांचे बँक खात्याचे आयएफसीसी कोड नसल्याने अनुदान बंद झाले. सदर वृद्धेचा विषय माझ्यापर्यंत आला नाही.- श्वेता संचेती, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना.

टॅग्स :Jalgaonजळगाव