शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

वृद्ध आणि महिलांना कायद्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 15:41 IST

पाटणा येथे 'महिला कायदा व सुरक्षा' या विषयावर आधार कायदेविषयक केद्राच्या अध्यक्षा व संभाजी सेना विधी सल्लागार अ‍ॅड.आशा शिरसाट यांनी मार्गदर्शन केले. वृद्ध आणि महिलांना कायद्याचे सुरक्षा कवच असून त्यांनी ते माहीत करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

ठळक मुद्देअ‍ॅड.आशा शिरसाट यांनी केले उद्बोधनपाटणा येथे झाले मार्गदर्शनर शिबिर

चाळीसगाव, जि.जळगाव : पाटणा येथे 'महिला कायदा व सुरक्षा' या विषयावर आधार कायदेविषयक केद्राच्या अध्यक्षा व संभाजी सेना विधी सल्लागार अ‍ॅड.आशा शिरसाट यांनी मार्गदर्शन केले. वृद्ध आणि महिलांना कायद्याचे सुरक्षा कवच असून त्यांनी ते माहीत करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. नुकतेच येथे मार्गदर्शन शिबिर पार पडले.पुढे बोलताना त्या म्हणाल्या, सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन देणे हे समाजातील जबाबदार घटकांचे कर्तव्य असून सर्वांनी प्रयत्नशील रहायला हवे. समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन देण्यासाठी कायदयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला महिलांनी पुढे यायला हवे. प्रत्येक पोलीस स्टेशनला हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची नियुक्ती, जिल्हा तसेच तालुकास्तरीय समित्यांची स्थापना या कायद्यांतर्गत करण्यात आलेली असते हे कायदे महिलांना माहित असायला हवेत. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा असो वा इतर फौजदारी कायदे असो राज्य महिला आयोगामार्फतही महिलांच्या या हक्क व अधिकारांची जपणूक केली जाते. यासोबतच कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये म्हणून विशाखा गाईड लाईन्सची अंमलबजावणी राज्यात सुरू असून राज्यभर तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. वयोवृद्ध व्यक्तींसाठी स्वतंत्र अशा पालनपोषण कायद्याची तरतूद केलेली असून वृद्धांनाही निराश्रीत न रहाता सन्मानाने जगता यावे यासाठी या कायद्याची तरतूद केलेली आहे. महिला,मुली आणि बालकांसाठी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.यावेळी युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव, देवरे फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.उज्ज्वला देवरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप भांडारकर, हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील, रांगोळी कलाकार कावेरी पाटील, माजी सरपंच अभिजीत शितोळे, योगिता राजपूत, अनिता शर्मा, विद्या कोतकर, स्वप्नील कोतकर, ब्रिजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन मुकुंद शितोळे यांनी, प्रास्ताविक शीतल शितोळे यांनी व आभार मुकुंद शितोळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी चेतन शितोळे, गणपत चौधरी, नीलेश साळुंखे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :WomenमहिलाChalisgaonचाळीसगाव