शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

ज्येष्ठांची वयोमर्यादा 65 ऐवजी 60 करणार

By admin | Updated: April 29, 2017 18:33 IST

ज्येष्ठांना पर्यटनासाठी विशेष सवलत देण्यासाठी प्रयत्न राहिल

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 29 - ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजासाठी अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाकडून प्राधान्य दिले जाईल. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 65 ऐवजी 60 वर्ष वयोमर्यादा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच ज्येष्ठांना पर्यटनासाठी विशेष सवलत देण्यासाठी प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या (फेस्कॉम) 32 व्या  वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी शहरातील शाहू नाटय़गृह झाले. यावेळी ते बोलत होते. रविवारी या अधिवेशनाचा समारोप होणार आहे. यावेळी फेस्कॉम सुकाणू समितीचे अध्यक्ष प्राचार्य व्ही.के.भदाणे, अध्यक्ष डी.टी.चौधरी, उपाध्यक्ष जी.एल.पाटील, नाना इंगळे, सोमनाथ बागड, अण्णा टेकाळे, प्राचार्य बी.एन.पाटील, अरुण रोडे आदी उपस्थित होते. सकाळी माजी आमदार व अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला. तसेच दिवसभर ज्येष्ठांसाठी विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते.प्रेरणादायी कहान्या प्रसिद्ध करणारजयकुमार रावल म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांचा विविध क्षेत्रातील अनुभवाचा फायदा शासनाला व्हावा म्हणून त्यांची समिती स्थापन करण्याच्या दृष्टीनेही विचार करण्यात येईल. या समितीचा सल्ला शासन घेईल. वयस्कर नागरिकांचे प्रेरणादायी कहान्या लोकराज्य मासिकातून प्रसिद्ध करण्यासाठीही प्रयत्न केले जातील. लोकराज्यमधील प्रत्येक अंकातील काही पाने किंवा वर्षातून एखादा अंक ज्येष्ठांवर आधारित काढण्यासाठी प्रयत्न राहतील. असेही त्यावेळी ते म्हणाले. शासन ज्येष्ठांच्या बाबतीत संवेदनशील आहे.विविध कार्यक्रमअधिवेशनानिमित्त सकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत ईशस्तवन, शंकर व गणेश वंदना, जिजाऊ वंदना कार्यक्रम झाला. त्यानंतर सानेगुरुजी यांची ‘खरा तो एकची धर्म’ प्रार्थना सादर करण्यात आली. तसेच यावेळी ‘ज्येष्ठराज’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठांची दशा व दिशा या विषयावर अरुण रोडे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी र.ग.चौधरी होते. यानंतर ‘निरोगी जीवन’ याविषयावर माया डॉ.माया कुलकर्णी, डॉ.गायत्री भतवाल, डॉ.माधुरी बाफना यांनी मार्गदर्शन केले.शासकीय योजना व अंमलबजावणी या विषयावर तहसीलदार ज्योती देवरे, मानसिंग जगताप, रंगराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब टेकाळे होते. या कार्यक्रमासाठी खान्देशातून सुमारे 1500 ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.