शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

नियामक मंडळाच्या जाचक अटी विरोधात पतसंस्थांचा जळगावी ५ रोजी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 17:08 IST

: नियामक मंडळाच्या जाचक अटीविरोधात५ फेब्रुवारी रोजी जळगाव येथे पतसंस्थाचालकांचा मेळावा आयोजित केला आहे.

पारोळा, जि.जळगाव : नियामक मंडळाच्या जाचक अटीविरोधात५ फेब्रुवारी रोजी जळगाव येथे पतसंस्थाचालकांचा मेळावा आयोजित केला आहे.जिल्ह्यातील पतसंस्थांनी आपले कामकाज बंद ठेवून दुपारी १ वाजता एस. एम. आय. टी. कॉलेज जळगाव येथे मेळाव्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा नागरी व पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे करण्यात आले आहे.महाराष्ट्रात सहकार क्षेत्राला उतरती कळा लागलेली असताना बहुतांश पतसंस्थाना अडचणीना सामोरे जावे लागत आहे. त्यात काही पतसंस्था नियम व धोरणानुसार सामना करून आपापल्या परिने कामकाज सुरळीत ठेवत असतानाच महाराष्ट्र शासनाने सहकार कायद्यात बदल करून नव्यानेच महाराष्ट्र राज्य पतसंस्था नियमक मंडळाची स्थापना करून १५ जानेवारी रोजी राज्यातील पतसंस्थाना त्यांच्या जमा ठेवीच्या ०.०५ टक्के अंशदान सदर नियमक मंडळाकडे भरावे. तसेच ज्या पतसंस्थाकडे खेळते भांडवल एककोटी पेक्षा कमी आहे अशा पतसंस्थांना कर्जदारास ५० हजारांपेक्षा जादा कर्ज देता येणार नाही व एक कोटी पेक्षा जादा खेळते भांडवल असेल तर त्यांनाही लावलेल्या निकषांवर कर्ज वितरण करावे लागणार आहे. संस्थेच्या उपविधीमध्ये काही ही नमुद असले तरी नियामक मंडळ जे जाहीर करेल त्याप्रमाणे ठेवी व कर्जावरील कमाल व्याजदर सर्व बिनाकृषी पतसंस्थाना बंधनकारक राहतील. पतसंस्था ह्या आधीच आर्थिक संकटात आहेत. अंशदान कोठून भरणार? शासनाने ९७ व्या घटना दुरूस्तीने पतसंस्थांना स्वायत्तता दिली असताना पुन्हा या जाचक अटीचा सामना पतसंस्थाना करावा लागणार आहे.राज्य शासनाने कलम १४४ नुसार सहकार कायदा दुरुस्ती करून घेतली आहे. त्या कलमातील तरतुदीप्रमाणे शासनाने एक नियामक मंडळ तयार केले आहे त्यातील शर्ती व अटी या अतिशय जाचक वाटत आहेत म्हणून जमा केल्या जाणाऱ्या अंशदान अनुदानाची रक्कम रद्द करण्यात यावी यासाठी ५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील पतसंस्थानी आपले कामकाज बंद ठेवून मेळाव्यास यावे, असे आवाहन जिल्हा नागरी व पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे, संचालक एम. बी. भाटिया, नरेंद्र पाटील, विजय दत्तात्रय नावरकर यांनी केले.